काँग्रेस पक्षाच्या वतीने आज गृहमंत्री अमित शहा यांच्या निषेधार्थ नांदेड शहरांमध्ये प्रचंड निषेध मोर्चा.


नांदेड प्रतिनिधी दि.( 24)
महामानव भारताचे संविधान निर्माते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रति देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत काढलेल्या अपमानित शब्दाबद्दल आज काँग्रेस पक्षाच्या वतीने नांदेड शहरात अमित शहा यांच्या निषेधार्थ भव्य असा प्रचंड निषेध मोर्चा काढण्यात आला.
हा मोर्चा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून घोषणा देत जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला व कार्यालयाच्या समोर निषेध मोर्चा चे सभेत रूपांतरित होऊन खा. प्रा. रवीद्र चव्हाण यांच्या सह अनेक नेत्यांनी ोर्चेकर्यांना संबोधित करीत जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी नांदेड जिल्ह्याचे खा. प्रा. रवींद्र चव्हाण, बी आर कदम, महानगर अध्यक्ष अब्दुल सत्तार, आंबेडकर चळवळीचे भाष्यकार सुरेश दादा गायकवाड , अनिल मोरे ,महेश देशमुख, अब्दुल गफार, डॉ. दिनेश निखाते, कुमार कुरथडीकर ,सुरेश हटकर, डॉ. करुणा जमदाडे, सत्यपाल सावंत, विठ्ठल पावडे, सुभाष काटकंबळे, संजय कवठेकर, गौतम शिरसाट ,प्रा. देविदास इंगळे ,गोविंद पाटील, आदी सह वरिष्ठ पदाधिकारी काँग्रेस प्रेमी मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.


