Uncategorized

शेळगाव छत्री येथे महर्षी वाल्मिकी जयंती, महात्मा फुलेंना अभिवादन

शेळगाव छत्री येथे महर्षी वाल्मिकी जयंती, महात्मा फुलेंना अभिवादन
नायगाव ता.प्रतिनिधी..
नायगाव तालुक्यातील मौजे शेळगाव छत्री येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आद्य कवी रामायण रचनाकार महर्षी वाल्मिकी यांची जयंती व वंदनीय महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करून गावच्या सरपंच सौ चांगुनाबाई अशोकराव बैलकवाड यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
प्रारंभी महान कवी महर्षी वाल्मिकी आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व त्यांना अभिवादन चेअरमन माधव पाटील शहापुरे, तंटामुक्ती अध्यक्ष माधव बैलकवाड, पहेलवान राजेश पाटील आनेराये,विश्वंभर धसाडे, कॉम्रेड माधव ऐन्जपवाड यांनी केल्यानंतर ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर सामूहिक राष्ट्रगीत घेण्यात आले.यावेळी मारोती शहापुरे,दिगाबंर ऐन्जपवाड, माधव निलावार, जयंती मंडळांचे अध्यक्ष नागेश ऐन्जपवाड,उपाध्यक्ष मारुती ऐन्जपवाड, सचिव राजाराम ऐन्जपवाड, भगवान बोंडलवाड, संतोष ऐन्जपवाड, माधव लक्ष्मण ऐन्जपवाड, हनुमंत डोंमलवाड. यासह गावातील नागरिक व समाज बांधव यांची उपस्थिती होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button