Uncategorized
-

उघड्यावर पडलेल्या विजेच्या तारेचा घात; खांडगावच्या २० वर्षीय युवकाचा मृत्यू, महावितरणच्या निष्काळजीपणाचा आरोप..
रघुनाथ सोनकांबळे….. नायगाव तालुक्यातील खांडगाव येथे उघड्यावर पडलेल्या विजेच्या तारेचा शॉक लागून २० वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली…
Read More » -

निकृष्ट सोयाबीन बियाण्यांनी शेतकऱ्यांचा घात; दोषी कंपन्या व विक्रेत्यांवर फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्याची मागणी ..
रघुनाथ सोनकांबळे…. यंदा उशिराने दाखल झालेल्या मान्सूननंतर मोठ्या अपेक्षेने शेतकऱ्यांनी सोयाबीनची पेरणी केली. मात्र अनेक कंपन्यांच्या बियाण्यांची उगवणच न झाल्याने…
Read More » -

एम.व्ही.के. ॲग्रो कुसुमनगर साखर कारखान्याच्या उभारणीसाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी कवळे गुरुजींची सकारात्मक चर्चा…
रघुनाथ सोनकांबळे… नांदेड जिल्ह्यातील लोककल्याणकारी शेतकरी नेते मारोतराव पाटील कवळे गुरुजी यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी…
Read More » नायगाव नगरपंचायतीत ‘एकहाती सत्ते’चा खेळ; नगराध्यक्ष-नगरसेवकांचा अपमान, विकास ठप्प – भ्रष्टाचाराचा भांडाफोड!” दहा वर्षात सहा नगराध्यक्ष, तीन मागासवर्गीय ,तीन ओपन.. रघुनाथ सोनकांबळे.. नायगाव नगरपंचायतीचा जवळपास दहा वर्षांचा कार्यकाळ संपत आला तरी शहराच्या विकासाचा आलेख मात्र शून्यावरच ठेपलेला दिसत आहे. दोन टर्ममध्ये तब्बल सहा नगराध्यक्ष बदलले, पण एकाही नगराध्यक्षाला किंवा नगरसेवकाला स्वतःचे अधिकार वापरण्याची संधी मिळाली नाही ,कि दिल्या गेली नाही हे विशेष धक्कादायक बाब समोर आली आहे. पहिल्या टर्ममध्ये मागासवर्गीय महिला अध्यक्ष आणि त्यानंतर दोन मागासवर्गीय पुरुषांना सत्तेचा ‘टर्न’ देण्यात आला. दुसऱ्या टर्ममध्ये ओपन महिला आरक्षणातही दोन ते तीन महिलांना अध्यक्षपद देण्यात आले. मात्र, हा सर्व कारभार केवळ नावापुरता राहिला. प्रत्यक्ष सत्ता मात्र नगरपंचायतीच्या उपाध्यक्षांच्या हातीच केंद्रित राहिली. त्यामुळे नगराध्यक्ष आणि नगरसेवक हे केवळ ‘सहीपुरते’ बाहुले मर्यादित राहिल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. समित्या नाहीत, विकास ठप्प! नायगावसारख्या नगरपंचायतीच्या मोठ्या शहरात विविध विकासकामांसाठी समित्या स्थापन होणे आवश्यक असताना, उपाध्यक्षांच्या वर्चस्वाला धक्का बसू नये म्हणून कि काय एकही समिती आजपर्यंत स्थापन करण्यात आली नाही. परिणामी, लोकशाही व्यवस्थेचा पूर्णपणे बळी गेला असून नगरसेवकांचा उघड अपमान झाला आहे. कोट्यवधींचा निधी कुठे गेला? विविध शासकीय योजनांमधून कोट्यवधी रुपयांचा निधी नगरपंचायतीकडे आला. मात्र, त्या निधीचा वापर कुठे झाला, कोणत्या कामासाठी खर्च झाला याची माहिती अनेक नगरसेवकांनाही नाही. आणि नागरिकांनाही नाही, कारण आलेल्या निधीच्या कामाचा शहरात कुठेही एक बोर्ड सुद्धा लावण्यात आलेला नाही. आलेला निधी आमक्यच्या घरापासून तमक्याच्या घरापर्यंत, ना वार्डाचा पत्ता आहे,ना नगरसेवकाचा पत्ता आहे, निधी किती आहे. कामाचे नाव काय आहे. याचा ठाव ठिकाण अद्याप तरी नाही. अशा परिस्थितीत जिल्हाधिकाऱ्यांनी कामांना मंजुरी दिलीच कसे हे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आसुन अनेक ठिकाणी कामे न करता निधी उचलल्याचे गंभीर आरोप होत असून, या कामाची तात्काळ चौकशी होणे अत्यंत गरजेचे असे न झाल्यास भ्रष्टाचाराला येथे मोकळे रान मिळाल्याचे स्पष्ट होईल यात तिळमात्र शंकेला जागा मिळणार नाही. मुख्याधिकारी ‘गायब’, भ्रष्ट व्यवहार मात्र सुरूच! नगरपंचायतीचे मुख्याधिकारी महिन्यातील केवळ १५ दिवसच मुख्यालयात उपस्थित असतात. उर्वरित काळात ते रजेवर किंवा अनुपस्थित असतात. मात्र, त्यांच्या अनुपस्थितीतच शहरातील गुंठेवारी आणि इतर भ्रष्ट व्यवहार तहसील विभागातील नायब तहसीलदारांच्या सहिने झपाट्याने पूर्ण होत असल्याची चर्चा असून, या व्यवहारातून मोठा आर्थिक ‘मलिदा’ उपाध्यक्ष, मुख्याधिकारी, तहसील मधील नायब तहसीलदार आणि नगरपंचायतीचे बोटावर मोजणारे विशेष कर्मचारी यांना पोहोचत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत. मूलभूत सुविधांचा अभाव – नागरिक त्रस्त दहा वर्षांच्या कालावधीत शहरात साधे सार्वजनिक शौचालय किंवा मुतारी उभारण्यात आलेली नाही. जल जीवन योजनेचा बोजवारा उडाला असून एकाही प्रभागांमध्ये जलजीवनाच्या थेंबाचा पत्ता नाही. जल जीवन च्या नावाने मात्र सात ते आठ हजार रुपये एका कनेक्शनला उकळण्यात आल्याची चर्चा आहे. मागासवर्गी वस्तीमध्ये पिण्याचे पाणी रस्ते नाल्या याचा पूर्ण अभाव असून एक टाईम शुद्ध पाणी पिण्यासाठी मिळत नाही. अशी दैनिय अवस्था शहरासहित मागासवर्गीय वस्तीची झाली आहे. मागासवर्गीय वस्तीच्या नावाने विकासाच्या दृष्टिकोनातून कोट्यावधी रुपये निधी शासनाने दिला पण तो निधी गेला कुठेॽ हाच प्रश्न अचंबित करत आहे. नांदेड–हैदराबाद महामार्गावर असलेल्या या महत्त्वाच्या शहरात बाहेर गावुन ये जा करणाऱ्या प्रवाशांसाठी निवाऱ्याचीही कोणतीही सुविधा नाही. उन्हात ताटकळत उभे राहणारे प्रवासी नगरपंचायतीच्या कारभारावर संताप व्यक्त करताना दिसत आहेत.तर काही प्रवासी या रोडवरील बस स्थानक, निवारा शोधताना दिसत आहेत. खासदारांवरही नाराजीचा सूर या शहराला कै. बळवंतराव चव्हाण, कै.वसंतराव चव्हाण आणि सध्या खासदार रवींद्र वसंतराव चव्हाण यांचा राजकीय वारसा लाभला आहे. मात्र, स्थानिक खासदार असूनही शहरातील प्रश्न सुटण्याऐवजी झपाट्याने वाढत चालल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
नायगाव नगरपंचायतीत ‘एकहाती सत्ते’चा खेळ; नगराध्यक्ष-नगरसेवकांचा अपमान, विकास ठप्प – भ्रष्टाचाराचा भांडाफोड!” दहा वर्षात सहा नगराध्यक्ष, तीन मागासवर्गीय ,तीन ओपन..…
Read More »-

नायगाव नगरपंचायतीत कचऱ्याचे राज्य मुख्याधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने ठेकेदार सुजला, शहरवासीयांच्या आरोग्याशी खेळ
रघुनाथ सोनकांबळे नायगाव… नायगाव नगरपंचायतीच्या हद्दीत घनकचरा व्यवस्थापन पूर्णपणे कोलमडले असून नगरपंचायतीच्या ढिसाळ कारभाराचे व ठेकेदार–अधिकारी संगनमताचे भीषण वास्तव…
Read More » कुंटूर पोलिसांची बाळेगाव येथील अवैध दारू विक्रेत्यावर मोठी कारवाई , घरातून देशी व विदेशी दारूचे बॉक्स असे मिळून 22 हजार रुपयाचा मुद्दे जप्त सिद्धार्थ गजभारे कुंटुर नायगाव तालुक्यातील कुंटूर पोलीस स्टेशन अंतर्गत अवैध दारू विक्रेत्यावर कुंटूर पोलिसांनी धाड टाकून 92 दारूच्या बाटल्या व बियरचे काही बॉक्स जप्त केले असून त्यात 22 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे. एक आरोपीवर गुन्हा दाखल करून ताब्यात घेतले आहे. अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल भोसले यांनी दिली आहे. गुप्त माहिती आधारे बळेगाव येथील गावांमध्ये नागेश दत्ता बेलकर यांच्या घरामध्ये दारूचे देशी दारूचे अवैध बॉक्स व बियर चे बॉक्स ठेवण्यात आले असल्याची अशी माहिती कुंटूर पोलिसांना मिळाली व त्या माहिती च्या आधारे सहायक पोलीस निरीक्षक विशाल भोसले यांच्या टीमने ही कामगिरी केली.यात पोलीस उप निरीक्षक मल्लिकार्जुन कोरामुंगे , बीट प्रमुख पवार, स्वामी ,महिला कर्मचारी सुनीता अलमोड,यांनी मिळून बळेगाव येथील बेलकर यांच्या घरावर धाड टाकून सदर देशी व विदेशी दारूचा साठा जप्त केला. सदर मालाची किंमत 22 हजार रुपयांच्या वर असल्याची माहिती पोलीस प्रशासनाने दिले आहे. कुंटूर पोलिसांच्या या कामगिरीमुळे परिसरातील अवैध वाल्यांचे चांगलेच धाबे दणाणले असल्याचे दिसत आहे.व सर्वसामान्य गावातील नागरिक समाधान व्यक्त करत पोलिसांच्या या कामगिरीचे कौतुक करत असल्याचे दिसत आहे.
कुंटूर पोलिसांची बाळेगाव येथील अवैध दारू विक्रेत्यावर मोठी कारवाई , घरातून देशी व विदेशी दारूचे बॉक्स असे मिळून 22 हजार रुपयाचा…
Read More »“सरकारी शाळा वाचवण्यासाठी प्रा. डॉ. शंकर गड्डमवारांचे अभियान वेगात! पत्रकार बांधवांनी सकारात्मक सहकार्य करावे — नम्र विनंती” नायगाव, ता. — नायगाव तालुक्यातील जिल्हा परिषद, महानगरपालिका व नगरपालिकांच्या शाळा टिकल्या पाहिजेत आणि त्या शाळांना खाजगी शिक्षणसंस्थांच्या बरोबरीने भौतिक सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजेत, या एकमेव उद्देशाने सेवानिवृत्त प्राध्यापक प्रा. डॉ. शंकर गड्डमवार यांनी अनोख्या अभियानाची सुरुवात केली आहे. गेल्या वर्षभरापासून सरकारी शाळा पुन्हा सक्षम करण्याच्या उद्देशाने सातत्याने प्रयत्न करणारे डॉ. गड्डमवार यांनी स्वतःच्या मुलीला जिल्हा परिषद शाळेत प्रवेश देत या अभियानाला प्रत्यक्ष कृतीची जोड दिली आहे. “सरकारी शाळांमध्ये विद्यार्थी वाढले, तर शिक्षकांची पदसंख्या वाढेल आणि गोरगरिबांच्या मुलांनाही रोजगाराच्या संधी निर्माण होतील,” असे ते म्हणाले. त्यांनी पत्रकार बांधवांना विनंती करताना सांगितले की, सरकार शिक्षणावरचा खर्च सतत कमी करीत असून सध्या तो केवळ २ ते २.५ टक्क्यांवर आला आहे. “शिक्षण नष्ट झाले तर विकासाचा रथ थांबेल; याचे बळी बहुजन समाज होण्याची भीती आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले. डॉ. गड्डमवार यांच्या मते, प्राथमिक शाळांपासून उच्चशिक्षणापर्यंतच्या संस्थांची अवस्था सुधारण्यासाठी एक देश – एक अभ्यासक्रम ही संकल्पना राबवणे अत्यंत आवश्यक आहे. सीबीएसई, आयसीएसई आणि राज्य मंडळातील विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा समान असताना अभ्यासक्रम वेगळे असणे योग्य नसल्याचे ते म्हणाले. सरकारी शाळा टिकल्या पाहिजेत, त्या शाळांमध्ये आधुनिक सुविधा, गुणवत्तापूर्ण शिक्षक आणि सशक्त पायाभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी नायगाव तालुक्यातील सर्व पत्रकार बांधवांनी या अभियानाकडे सकारात्मक नजरेने पाहून जनतेपर्यंत या चळवळीचा संदेश पोहोचवावा, अशी त्यांनी नम्र विनंती केली. नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात हा प्रश्न उपस्थित न झाल्यास मार्चमधील अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान ज्येष्ठ नागरिक व बुद्धिजीवी यांच्या वतीने मोठा मोर्चा काढण्याची तयारी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. प्रा. डॉ. शंकर गड्डमवार – पहिले प्राध्यापक ज्यांनी स्वतःच्या मुलीला जिल्हा परिषद शाळेत दाखल करून सरकारी शाळा व बहुजन विद्यार्थ्यांचे हित जपण्याचा धाडसी पुढाकार घेतला आहे. अभियान व्यापक करण्यासाठी पत्रकार बांधवांचे सहकार्य अत्यावश्यक असल्याचे ते पुन्हा अधोरेखित करतात. संपर्क : 94 21 76 78 88
Read More »-

कुस्नुर एमआयडीसीत बिबट्याचा थरार! कामगारावर पाठीमागून हल्ला; परिसरात दहशतीचे वातावरण वनविभाग व पोलिसांची तातडीची मोहीम सुरू — नागरिकांना सतर्कतेचे आवाहन..
रघुनाथ सोनकांबळे नायगाव.. 29 नोव्हेंबर 2025 कुस्नुर एमआयडीसी परिसर आज दुपारी अक्षरशः हादरून गेला, जेव्हा सिट्रीच कंपनीसमोर काम…
Read More » -

पालकसभा उत्साहात पार; प्रा. डॉ. जीवन चव्हाण यांचे मार्गदर्शन
रघुनाथ सोनकांबळे नायगाव… गुरुकुल पब्लिक स्कूल, नायगाव येथे आयोजित पालकसभेस पालक आणि चिमुकल्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या सभेचे…
Read More » नांदेड जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे पडघम आता वाजायला सुरुवात झाली .
रघुनाथ सोनकांबळे नायगाव …. कालच नांदेड जिल्ह्यातील जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणाचे आरक्षण जाहीर करण्यात आले त्यानुसार…
Read More »