नायगाव (खै.) तालुक्यातील सन २०२५ ते २०३० या कालावधीत होणाऱ्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या अनुषंगाने सरपंचपदाचे आरक्षण निश्चित करण्याची प्रक्रिया मंगळवार, २२ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी ३ वाजता तहसील कार्यालय, नायगाव (खै.) येथे पार पडणार आहे.
या आरक्षण प्रक्रियेसंदर्भात संबंधित ग्रामपंचायतींचे सदस्य तसेच इच्छुक नागरिक यांच्या उपस्थितीत पारदर्शक पद्धतीने आरक्षण निश्चित करण्यात येणार आहे. त्यामुळे संबंधित ग्रामपंचायतींचे सदस्य तसेच इच्छुक नागरिकांनी सदर कार्यवाहीस उपस्थित राहावे, असे आवाहन नायगाव तालुका तहसील प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
सदर सरपंचपदाचे आरक्षण शासनाच्या मुंबई ग्रामपंचायत (सरपंच व उपसरपंच) निवडणूक नियम, १९६४ मधील तरतुदीनुसार करण्यात येणार असल्याचे जाहीर सूचनेत नमूद करण्यात आले आहे.नायगाव तालुक्यातील आगामी ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या आरक्षणाकडे संबंधित गावांचे लक्ष लागले असून, आरक्षण सोडतीनंतर ग्रामपंचायत निवडणुकीतील राजकीय समीकरणांनाही वेग येण्याची शक्यता आहे.