मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची निवड झाल्याबद्दल धर्माबाद मध्ये जल्लोष
गेल्या बारा दिवसांपासून राज्याचे मुख्यमंत्री कोण होणार याकडे राज्याचे लक्ष लागले होते

धर्माबाद प्रतिनिधी
नागनाथ माळगे……..
धर्माबाद .. महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड झाल्याबद्दल धर्माबाद शहर व तालुका भाजपा व महायुतीच्या वतीने पानसरे चौक येथे फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली.
महाराष्ट्र राज्यात विधानसभेची निवडणूक होऊन गेल्या बारा दिवसांपासून राज्याचे मुख्यमंत्री कोण होणार याकडे राज्याचे लक्ष लागले होते. अखेर ५ डिसेंबर रोजी सायंकाळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा शपथविधी सोहळा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व विविध राज्यातून आलेले विद्यमान मुख्यमंत्री, संत महंत व भाजपा कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांसह महायुतीच्या कार्यकर्त्याच्या उपस्थितीत पार पडला आणि धर्माबाद शहर व तालुका भाजपा व महायुतीच्या वतीने फटाक्यांची आतिषबाजी करत विजय जल्लोष साजरा करण्यात आला. याप्रसंगी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.



