Latest Newsआपला जिल्हानांदेड

भारताचे मा.पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने हक्काच शहर मोहीम*

खा.रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न.

रघुनाथ सोनकांबळे……..

नांदेड  – भारतरत्न माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने खा. रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते व महानगराध्यक्ष अब्दुल गफ्फार यांच्या आयोजनात महानगरपालिका स्तरावरील हक्काच शहर या मोहीमेचे उद्घाटन गुरुवार (ता.२०) रोजी करण्यात आला. दरम्यान या मोहीमे अंतर्गत प्रभागनिहाय नागरी समस्येवर जनसुनावणी च्या माध्यमातून आवाज उठविण्यात येणार आहे.

प्रदेश काँग्रेसच्या निदर्शनानुसार शहरातील नागरी समस्येवर मंथन करण्यासाठी शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने हक्काच शहर ही मोहीम राबविण्यात येणार आहे. दरम्यान भारतरत्न माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने खा.रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते व महानगराध्यक्ष अब्दुल गफ्फार यांच्या आयोजनात गुरुवार (ता.२०) रोजी कांग्रेस पक्ष कार्यालय नवा मोंढा नांदेड येथे या मोहिमेचे उद्घाटन करून पत्रकार परिषद घेण्यात आली.

शहरातील प्रभाग निहाय पाणी, ड्रेनेज, लाईट, रस्ते,कर,आदी नागरी मूलभूत समस्यासह विविध समस्येवर खा. रवींद्र चव्हाण‌ व महानगर अध्यक्ष माजी उपमहापौर नगरसेवक अब्दुल गफ्फार साहेब यांच्या उपस्थितीत नागरी बैठका घेण्यात येणार आहे, यानंतर महानगरपालिकेकडे पाठपुरावा करण्यात येणार आहे. अशी माहिती खा. रवींद्र चव्हाण व महानगराध्यक्ष अब्दुल गफ्फार यांनी दिली.

यावेळी सुरेंद्र घोडसकर, डॉ. श्रावण रँपनवाड, अनिल मोरे, आनंद चव्हाण, कुमार कुर्तडीकर, नगरसेवक सत्यपाल सावंत, शेख पाशा,अलीम खान, गगन यादव, गजानन कल्याणकर, अंबादास रातोळे, रिजवान पटेल, नागराज सुलगेकर, शंकर शिंदे, सुरज शिंदे, संजय वाघमारे, दादाराव ढगे, रमेश चित्ते, अब्दुल रहिम, बापूसाहेब पाटील, नईम शेख, गणेश कोकाटे, गोविंद पाटील, सोनू पाटील, अजर शेख, गौतम शिरसाट, संजय कवठेकर, प्रितम जोंधळे, संजय पोमदे, शिवकांता कदम, कलिम शेख, संदीप कदम,रामचंद्र गायकवाड, आदीसह उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button