Latest NewsUncategorizedआपला जिल्हानांदेडनायगांव

बोगस पाणीपुरवठा योजनेचे विरोधात ग्रामस्थ आक्रमक*

दि.१० फेब्रुवारी रोजी मांजरम येथे रस्ता रोको आंदोलन*

 

रघुनाथ सोनकांबळे..दि..(६)

मांजरम गावची पाणीपुरवठा योजना सन २०१८ या काळामध्ये मंजूर झालेली होती आणि तेव्हाच कामाला सुरुवात झाली होती.अद्यापही योजना पूर्ण झाली नाही आणि झालेले कामे अत्यंत बोगस आणि निकामी झाले आहेत आणि उन्हाळ्यामध्ये पाणीटंचाईला सामोरे जावावे लागणार आहे,त्यामुळे सर्व ग्रामस्थ मिळून दि.१० फेब्रुवारी रोजी मांजरमच्या मुख्य चौकात रस्ता रोको आंदोलन करनार आहेत.

img 20250206 wa0046
img 20250206 wa0046

योजना आठ कोटी रुपयाची आहे सदर योजना संतोष कन्स्ट्रक्शन आणि रोहन कन्स्ट्रक्शन या दोन कन्स्ट्रक्शन ला मिळालेले हे काम आहे. नागरिकांच्या दारात पाणी तर आलेच नाही पण रस्ते मधोमध खोदल्यामुळे गावातील नागरिकांना चालणे सुद्धा अवघड होऊन चाललेले आहे,त्यामुळे ग्रामस्थ अनेकदा निवेदन देऊन सुद्धा यावर काहीही कारवाई झाली नसल्याकारणाने आंदोलनाचे हत्यार उपसलेले आहेत.

या आंदोलनाची निवेदनाची प्रत मुख्यमंत्री, पाणीपुरवठा मंत्री, जिल्हाधिकारी नांदेड, मुख्य कार्यकारी अधिकारी जि. प .नांदेड, पोलीस अधीक्षक नांदेड यांना देउन कळविण्यात आले आहे. अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार जिल्हा
उपाध्यक्ष पांडुरंग शिंदे यांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button