सा.बां.विभाग भोकर अंतर्गत तात्पुरत्या नियुक्ती व प्रतिनियुक्तीवर काम करत असलेल्या कर्मचाऱ्यांची व अधिकाऱ्यांची चौकशी करुन कार्यवाही करा.
सात दिवसांत चौकशी नाही झाल्यास उपोषण करणार.

उमरी प्रतिनिधी/अनिल सोनकांबळे.
भोकर:- येथील सार्वजनीक बांधकाम विभाग भोकर अंतर्गत कार्यरत असलेले कर्मचारी अधिकारी यांच्या बदल्या व प्रतिनियुक्तीवर सा.बां विभाग भोकर येथे कार्यरत असलेल कर्मचारी यांची ज्यां ठिकाणी बदली झाली होती परंतु अधिकारी यांच्याशी आर्थिक देवाण घेवाण करुन त्याच ठिकाणी प्रतिनियुक्तीवर कांही अधिकारी धर्माबाद, उमरी तालुक्यात बोगस कामाचे कळस गाठले आहेत. त्यामुळे भोकर, उमरी, धर्माबाद तालुक्यातील जनता यांच्या कामावर नाराज आहे. सन 2019 ते 2024 अंदाज पाच वर्षांत प्रतिनियुक्तीवर असलेले कर्मचारी 1) जे.जी. जाधव (शाखा अभियंता), 2) एस आर कोलेवाड 3) पी.एस. माळी (कनिष्ठ अभियंता), 4) आर.एम उमाळे (कनिष्ठ 5) एस एच नमखाने कनिष्ठ अभियंता) 6) श्री शेख दाऊद अब्दुल (स्था सहाय्यक अभियंता श्रेणी), शाखा अभियंता,7) बी जी वाकोडे (स्था.अ. सहा.), 8) सी. के. कुडेकर (स्था.प.सहा.9)डी बी मोरे (स्था अ सहा.) 10) आर. आर. आदेर (स.अभियंता श्रेणी) या कर्मचारी व अधिकारी यांची शासनाच्या आदेशाप्रमाणे बदली झाली होती यांनी जाणीवपूर्वक प्रतिनियुक्तीचा बहाना करुन या कर्मचाऱ्यांनी तिनं तालुक्यातील सी सी रोड नाली बांधकाम डांबरी करणाचे आणि पुर्नवसनातील अनेक गावातील कामे निकृष्ट दर्जाचे मटेरिअल वापरुन या तिन्ही तालुक्यांतील अति बोगस काम केली आहेत. या प्रतिनियुक्तीची बाब ही बदली आदेश येऊन ही जे कर्मचारी अधिकारी प्रतिनीयुक्तीवर राहून बोगस कामे केली आहेत, यांची तात्काळ चौकशी करावी.अशा मागणीचे निवेदन आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते गंगाधर सवई,डी.जी. तुपसाखरे जिरोनेकर, सय्यद फेरोज पटेल,व शेख आरीफ निमटेककर यांनी निवेदनाद्वारे मागणी केली आहे.मा.कार्यकारी अधिकारी साहेबांनी या निवेदनाची सखोल चौकशी करुन संबंधीत दोषी कर्मचारी अधिकारी यांच्यावर शिस्त भंगाची कार्यवाही करावी. हि चौकशी 7 दिवसात पारदर्शक नाही झाल्यास जनहित लक्षात घेऊन आपल्या सार्वजनिक बांधकाम विभाग भोकर, ता. भोकर जि.नांदेड येथे लोकशाही मार्गाने आमरण उपोषण दि. 12/12/2024 रोज गुरुवारी सकाळी ठिक 11 वाजता आमरण उपोषण करण्यात येईल याची सार्वजनिक बांधकाम विभागाने व पोलीस प्रशासनाने याची नोंद घ्यावी. या आमरण उपोषणात आमच्या जीवाचे काही बरे वाईट झाल्यास बांधकाम विभाग भोकर येथील कार्यकारी अभियंता शाखा अभियंता हे जबाबदार राहतील असेही ते आमच्या प्रतिनिधींशी बोलताना म्हणाले.सदरील निवेदन हे खालील कार्यालयात देण्यात आल्याचेही सांगण्यात आले 1. मा. अधिक्षक अभियंता साहेब, सा.बा. विभाग कार्यालय नांदेड 2. उपविभागीय जिल्हाधिकारी साहेब, जिल्हा कार्यालय नांदेड 3. उपविभागीय जिल्हाधिकारी साहेब, उपविभागीय कार्यालय भोकर4. मा. पोलीस निरीक्षक साहेब, पोलीस स्टेशन भोकर5. मा. सचिव साहेब, सा.बा.वि. मंत्रालय मुंबई (32).



