Uncategorized

परभणी येथे संविधान स्तंभाचा अवमान व तोडफोड करणाऱ्यांना  कठोर शिक्षा देण्यात यावी. विविध आंबेडकर संघटनांची मागणी..

आज नायगाव शहरात परभणी येथे घडलेल्या घटनेच्या संदर्भात विविध आंबेडकरी संघटनाच्या वतीने नायगाव बंद करून निषेध व्यक्त करण्यात आला आहे..

 

दिनांक 10/12/24/ रोजी परभणी येथे विश्वरत्न बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा समोरील संविधान स्तंभाची तोडफोड व हवामान करणाऱ्यांना नरधामास अटक करून कठोर शिक्षा देण्यात यावी यासाठी आज नायगावच्या तहसीलदारांना *फुले शाहू आंबेडकर* *युवा मंच* वतीने व *रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया व्यापारी* *आघाडी आठवले गट* व *वंचित बहुजन आघाडी* सर्व पक्षांच्या वतीने निवेदन देऊन नायगाव शहरात रॅली काढण्यात आली. महामानव डॉ .बाबासाहेब आंबेडकर,छत्रपती शिवाजी महाराज ,लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या नावाची घोषणा देत परभणीत घडलेल्या घटनेचा जाहीर निषेध करण्यात आला.

यावेळी साहेबराव कोपरेकर.धम्मदिप भद्रे कांडाळकर अविनाश गायकवाड,सतीश वाघमारे, बाळासाहेब सोनकांबळे,माधव इंगळे,धम्मानंद सोनकांबळे आणि सर्व नायगाव तालुक्यातील भिमसैनिक* मोठ्या संख्येने उपस्थित होते .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button