Latest Newsआपला जिल्हानांदेडनायगांव

उद्या आरक्षण उपवर्गीकरणाच्या विरोधात नांदेड येथे महामोर्चा* नरसी येथून भव्य मोटार सायकल रॅली चे नियोजन

रघुनाथ सोनकांबळे……..

उद्या नांदेड येथे अनुसूचित जातीच्या आरक्षण उपवर्गीकरणाच्या विरोधात आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वात महात्मा फुले पुतळा परिसर ते जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे महामोर्चा संपन्न होणार आहे.
त्या अनुषंगाने नरसी येथून या महामोर्चा मध्ये सामील होण्यासाठी भव्य मोटार सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.

 

नरसी येथील शासकीय विश्रामगृह येथून या रॅलीला सकाळी ठीक ९.३० वाजता सुरुवात होईल. देगलूर बिलोली मुखेड व नायगाव तालुक्यातील नरसी मार्गे नांदेड जाणारे आंदोलक नरसी येथील शासकीय विश्रामगृह समोर येऊन एकत्रित पणे जमावे व रॅलीमध्ये सहभागी व्हावे असे नरसी व नायगाव परिसरातील आंदोलकांनी अहवान केले आहे.

नांदेड येथे मोर्चाला सकाळी अकरा वाजता सुरुवात होईल तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या मोर्चाची सांगता होईल. मोर्चातील सहभागी आंदोलकांना संबोधित करण्यासाठी रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष इंजि.आनंदराज आंबेडकर, द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया चे भीमराव आंबेडकर,माजी मंत्री राजकुमार बडोले, अध्यक्ष चर्मकार महासंघ तथा माजी मंत्री बबनराव घोलप, संविधान तज्ञ ॲड.सुरेश माने, भारतीय यांच्या सह अनेकांनी उपस्थित राहणार आहेत.

अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणास ठाम विरोध करण्यासाठी उद्या दिनांक 9 ऑगस्ट 2026 रोजी नरसी येथील मोटरसायकल रॅली मध्ये सहभागी होऊन नांदेड येथील महामोर्चात उपस्थित राहण्याचे अहवान नरसी येथील युवा सामाजिक कार्यकर्ते सचिन भेदे,बबलू नरसीकर व किरण भेदे यांनी केले आहे.

उद्याच्या रॅलीमध्ये किमान 200 पेक्षा जास्त मोटरसायकली असतील व नरसी परिसरातून मोठ्या प्रमाणात युवक या रॅलीमध्ये सहभागी होतील अशीही माहिती मिळाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button