Latest Newsआपला जिल्हानांदेडनायगांव

मी चौकशी च्या भीतीने पक्ष बदलला नाही तर वरिष्ठांच्या आदेशाने पक्ष बदलला*

आमदार प्रताप पाटील चिखलीकर.....

अशोक चव्हाणांचे नाव न घेता आमदार प्रतापराव पा. चिखलीकर यांनी लगावला टोला…

नायगाव रघुनाथ सोनकांबळे..दि.(२२)

जे नेते नेहमीच अनेक वेळा वारंवार माझ्यावर टीका टिपणी करीत होते की मी पक्ष बदलणारा म्हणून पण आज तेच पक्ष बदलले आहेत आत्म परीक्षणं करावे.मी चौकशी च्या भीतीने पक्ष बदलला नाहीतर वरिष्ठांच्या आदेशाने पक्ष बदलला.परंतु मी अनेक पक्ष बदललो तरी माझे सर्वांसोबत जिव्हाळ्याचे ऋणानुबंध पूर्वी पासूनच असल्यामुळे मी निवडून आलो,मी कसा पराभूत होईल हा आनंद त्यांना वाटत होता. पण मी सतत निवडून येत राहिलो हाआनंद माझ्यासह माझ्या स्नेहीचा आहे. शिवराज पाटील होटाळकर यांनी आयोजित केले ल्या राष्ट्रवादी पक्ष (अजित पवार गट) प्रवेश सोहळा व सभासद नोंदणी अभियान या कार्यक्रमात अशोकराव चव्हाण यांचे नाव न घेता आ.प्रताप पा. चिखलीकर यांनी निशाणा साधला आहे.

नायगांव शहरातील हेडगेवार चौक येथे राष्ट्रवादी (अजित पवार)गट पक्ष प्रवेश सोहळा,सभासद नोंदणी अभियान या आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार.प्रताप पा. चिखलीकर यांच्यासह जिल्हाध्यक्ष दिलीपराव धर्माधिकारी बरबडेकर,प्रदेश सरचिटणीस विक्रम देशमुख, वसंत सुगावे, उत्तमरावसोनकांबळे,संभाजीराव मुकनर अँड.बाळासाहेब कांबळे, रणजीत पाटील हिवराळे, दिलीप पा.चोळाखेकर, तालुका अध्यक्ष धर्माबाद अंकुश हनुमंते,यादवराव तुडमे,ज्ञानेश्वर कदम, पाटील शिंदे तालुकाध्यक्ष नायगाव,ज्ञानेश्वर सुर्यवाड,विशाल पाटील शिंदे,सचिन पाटील बेंद्रीकर,आनंद पाटील पवार, यांची प्रमुख उपस्थिती होती.

शिवराज पाटील होटाळकरांनी आपल्या प्रास्ताविकातून म्हणाले की, राष्ट्रवादी पक्ष हा राज्यातील सर्व सामान्य कार्यकर्त्यांना यांना बळ देणारा पक्ष म्हणून ओळखल्या जाते. भोकर येथे कार्यकर्त्यांचा खूप मोठ्या प्रमाणात नुकताच पक्ष प्रवेश सोहळा झाला आहे. नांदेड जिल्ह्यातील राष्ट्रवादी पक्ष हा आमदार चिखलीकर यांचा गट म्हणूनओळखला जाईल असे आपण 24 तासांपैकी 18 तास पक्षा साठी काम करू असेही यावेळी ते म्हणाले यासह जीवन चव्हाण , विक्रम देशमुख,वसंत सुगावे, यांनीही या वेळी आपले मत व्यक्त केले.

आ. चिखलीकर बोलताना पुढे म्हणाले की ,येत्या 28 तारखेला आ.मोहन हंबर्डे हे देखील राष्ट्र वादी पक्षात प्रवेश करणार आहेत, सतेविना जमणारी मंडळी देखील आपल्या जिल्ह्यात आहे सिंचनाच्या प्रश्ना वर अनेकांनी प्रश्न केला याबाबत आपण एक शिष्टमंडळ ना.अजित पवार यांना भेटून याविषयी सखोल चर्चा घडवून आणूया असे सांगत ते पुढे म्हणाले. राष्ट्रवादी पक्ष हा शिवा जी,लहू ,फुले,शाहू आंबेडकर यांच्या विचारा धारेवर चालणारा पक्ष आहे म्हणून आपण जोमाने काम करूया तुम्ही माझी खूप तारीफ केली परंतु मी देखील तुमच्या सारखाच कार्यकर्ता आहे असेही ते म्हणाले,

सदर कार्यक्रमांचे सूत्र संचालन व्यंकटराव पाटील शिंदे यांनी केले आहे तर आभार श्रीपती पा.शिंदे यांनी मानले.यावेळी. गंगाजी पाटील मुगांवकर श्रीकांत पाटील शिंदे मांजरंम कर,प्रदीप पाटील पवळे आनंदराव पाटील शिंदे,रमेश पाटील पवार, विशाल
पाटील शिंदे , विलास पाटील धुपेकर यासह तालुक्यातील महिला व पुरुष यांची मोठ्या संख्येने यावेळी उपस्थिती होती

रेखाताई शेळगावकर सह अनेकांचा राष्ट्रवादीत प्रवेशराष्ट्रवादी काँग्रेस मध्ये काँग्रेस जिल्हा महिला आघाडी सर चिटणीस रेखाताई शेळगावकर यांनी असंख्य महिला कार्यकर्त्या सह प्रवेश केला,तर भाजप मंडळ प्रमुख साहेबराव देगावकर, उपसरपंच कैलास जाधव,आत्माराम जाधव,मारोती मोरे,गोविंद डाकोरे सरपंच, आनंदराव शिंदे आंतरगाव,मंगेश बेंद्रीकर,रावसाहेब बेलकर, उमाकांत कुरे ताकबीड, शिवराज जाधव,निळकंठ जाधव,मारोती भाकरे या सह शेकडोभाजप,काँग्रेस,कार्यकर्त्यांनी प्रवेश केला.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button