Uncategorized
राष्ट्रीय चर्मकार महासंघ जि.नादेड ता.नायगांव च्या वतीने परभणी येथे संविधान स्तंभाची विटंबना व तोडफोड करणाऱ्यांना नराधमास अटक करून कठोर शिक्षा करा. राजेंद्र कांबळे

नायगाव प्रतिनिधी
नायगाव बा .दि..१३. परभणी येथे विश्वरत्न बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा समोरील संविधान स्तंभाची तोडफोड व हवामान करणाऱ्यांना नरधामास अटक करून कठोर शिक्षा करण्यात यावी यासाठी आज नायगाव बाजार या ठिकाणी राष्ट्रीय चर्मकार महासंघ महाराष्ट्र जिल्हा नांदेड तालुका नायगाव च्या वतीने राजेंद्र कांबळे यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार व पोलीस स्टेशन नायगाव येथे निवेदन देण्यात आले सर्वांनी आपले व्यवहार बंद ठेवून या निषेध मोर्चात मध्ये सामील झाले होते.
यावेळी उपस्थित समाजबांधव राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष राजेंद्र कांबळे व प्रसिद्धी प्रमुख नागेश भालके, शिवाजी हवेलीकर, सय्यद आजार शेठ ,विठ्ठल गंगासागरे ,रामचंद्र रोडे, संदिप कांबळे यांच्या सह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.


