महाराष्ट्र

परभणी येथील घटनेतील आरोपीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा- बाबासाहेब सुर्यवंशी

अशा मागणीचे निवेदन महाराष्ट्र संघर्ष अभियान चे अध्यक्ष बाबासाहेब सुर्यवंशी यांनी दिले आहे.

 

उदगीर/ प्रतिनिधी

परभणी येथे डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ असलेल्या संविधानाच्या प्रस्तावनेची नासधूस करणाऱ्या नराधमास देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशा मागणीचे निवेदन महाराष्ट्र संघर्ष अभियान चे अध्यक्ष बाबासाहेब सुर्यवंशी यांनी दिले आहे.
परभणीच्या घटनेचा निषेध व आरोपीवर कठोर शासन व्हावे यासाठी प्रशासनाने जास्तीतजास्त गुन्हे दाखल करावेत. त्याच्या कृत्यामुळे देशातील कायदा- सुव्यवस्था बिघडली आहे. त्यामुळे कठोर शासन होणे गरजेचे आहे, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आले आहे. या निवेदनावर बाबासाहेब सुर्यवंशी, अशोक कांबळे, सुधाकर जाधव, शरद तपशाळकर, सुनील पकोळे, धिरज वाघमारे, सतीश पाटील, दगडू शिंदे, मारोती मानकरी, मल्लिकार्जुन सुर्यवंशी, विश्वनाथ वनकर, नरसिंग कांबळे, गोविंद शिंदे, संग्राम गायकवाड, प्रल्हाद सुर्यवंशी, बी. आर. शृगारे, सोमवंशी रामराव, कांबळे डि. पी. , कांबळे पुंडलीक, सुर्यवंशी तुकाराम, कांबळे जी. आय., मोरे. एन. एस., डी. एन. गुंजरगे, ढवळे विठ्ठल, सोनकांबळे, के.के, प्रभाकर वाघमारे, दादाराव कांबळे, संतोष गायकवाड, ज्ञानोबा कोकणे, चंद्रकांत कांबळे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button