संत गाडगे बाबांच्या पुण्यतिथीनिमित्त आश्रम शाळेच्या विद्यार्थ्यांनी केला परिसर स्वच्छ………

उदगीर प्रतिनिधी दि.(२०) येथून जवळच असलेल्या बोरतळा तांडा येथील रमेश पवार प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेत संत गाडगेबाबा महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक किशनराव जाधव गुरुजी तर प्रमुख अतिथी म्हणून माध्यमिक आश्रम शाळेचे मुख्याध्यापक विश्वंभर फावडे, अविनाश पाटील उपस्थित होते
. सर्वप्रथम संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली यावेळी शरद शिंदे आणि प्रस्ताविकात गाडगेबाबा हे खरे स्वच्छतेचे पुजारी होते व गाडगेबाबांनी सांगितलेले उपदेश गाडगेबाबांच्या जीवनातील अनेक प्रसंग शरद शिंदे यांनी व्यक्त केले
तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष समारोपात गाडगेबाबा विषयी भरभरून असं मार्गदर्शन मुख्याध्यापक किशन जाधव गुरुजी यांनी विद्यार्थ्यांना सांगितले
तसेच गाडगेबाबा हे स्वच्छतेचे पुजारी समजून संत गाडगे बाबा चा उपदेश स्वच्छता ठेवा हे विद्यार्थ्यांनी शाळेचा परिसर स्वच्छ करून संत गाडगेबाबाचा उपदेश आचरणात आणला यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व प्रस्ताविक शरद शिंदे तर आभार सुरज इंद्राळे यांनी मांडलेकार्यक्रमाला विद्यार्थी व शिक्षक , पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


