कृषी उत्पन्न बाजार समितीचा पाया शेतकरी आहे……… तहसीलदार राम बोरगावकर

उदगीर प्रतिनिधी दि..(२१) कृषी उत्पन्न बाजार समितीचा पाया शेतकरी आहे असे उदगार आडत व्यापारी वेलेफेअर असोसिएशनच्या वतीने काढण्यात आलेल्या 2025 च्या दिनदर्शिकेचे प्रकाशन सोहळच्या कार्यक्रमात उदघाटन प्रसंगी बोलत होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बाजार समितीचे माजी सभापती शिवाजीराव हुडे हे होते.प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस प्रा. शिवाजीराव मुळे, बाजार समितीचे संचालक वसंत पाटील, मधुकर एकुरकेकर,
प्रमोद पाटील,जगदीश बाहेती,रवींद्र कोरे,गौतम पिपरे,बाजार समितीचे सचिव प्रदीप पाटील, उद्योजक लक्ष्मीकांत चिकटवार, आडत व्यापारी वेल्फेअर असोसिएशनचे
अध्यक्ष श्रीधर बिरादार ई उपस्थितीत मान्यवरच्या हस्ते दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले
पुढे बोलताना तहसीलदार राम बोरगावकर म्हणाले कि, उदगीर येथील व्यापारी हे आपण समाजाचं काहीतरी देण लागतो हे उद्देश डोळ्यासमोर ठेऊन व्यापारी काम करतात.
उदगीर बाजार पेठेत चांगला भाव मिळतो म्हणून कर्नाटक, आंधप्रदेश, राज्यातून माल येतो असे ते म्हणाले.या वेळी प्रा. शिवाजीराव मुळे, शिवाजीराव हुडे यांनी आपले विचार व्यक्त केले.
या कार्यक्रमाला उपाध्यक्ष शिवशंकर बिरादार,साईनाथ कल्याने, सचिव मनोहर बिरादार,चंद्रकांत बिरादार,भरत दीडमे, सुनील पाटील, उमाकांत पांढरे,दिलीप जाधव,शयाम बिरादार, मलिकार्जून रेगुडे, मारोती कडेवार, निलेश कालाणी,
शिवाजी पेठे, प्रमोद पाटील, दत्तात्रय जगळपुरे, संजय बिरादार, अरविंद जिरगे, कमलाकर भंडे ,यांच्यासह उमाकांत वसमते, लव्हू राजुळे, शिवाजी चिमणचोडे, बाळू लासूने, मदने मामा, चंद्रकांत बिरादार, सुरेश लांडगे,दिगांबर गोटमुकले,यांच्यासह
व्यापारी, आडते,बाजार समितीचे कर्मचारी,शेतकरी, गुमस्ता, हमाल बांधव, मोठ्या संख्येने उपस्थित होते
. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आडत व्यापारी असोसिएशन चे सहसचिव नागेश आंबेगावे यांनी तर आभार बाजार समितीचे संचालक मधुकर ऐकुर्केकर यानी मांडले…



