Latest Newsआपला जिल्हानांदेडनायगांव

नायगाव येथील गोवंश  कत्तलखान्यावर धाड टाकून ६२ किलो गोमांस नायगाव पोलिसांनी पकडले..  नायगाव पोलीसाची धाडसी कार्यवाही….

नायगाव  प्रतिनिधी…

नायगांव येथील जुना मोंढा खाटीक गल्लीतील कत्तलखान्यावर धाड टाकून पोलिसांनी जवळपास १२४९० रू. किमतीचे गोवंश मांस जप्त केले आहे. यामध्ये चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल झाला असून परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक किरण पोपळघट यांच्या नेतृत्वाखाली दि.१६ में २०२५ रोजी शुक्रवारी ही कारवाई करण्यात आली आहे.
याबाबत पोलीसांनी दिलेली सविस्तर माहिती अशी की परिविक्षाधीन पोलीस उपअधिक्षक किरण पोपळघट यांना गुप्त बातमीदाराने माहिती देवून खाटीक गल्लीतील कत्तलखान्यात गोवंश मांस असल्याचे सांगितले. त्यावरून नायगांव पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक गजानन तोटेवाड, पो.हे.कॉ. साई सांगवीकर सह पथकाने पंचांसह खाटीक गल्ली भागातील कत्तलखान्यावर धाड टाकली असता तेथे गोवंशाचे मांस विक्री होत असल्याचे आढळून आले.पोलीस पथकाने हे गोवंश मांस व इतर साहित्य जप्त केले. जप्त केलेले गोवंश मांस जवळपास ६२ किलो वजन भरले असून त्याची किंमत १२,४९० रुपये एवढी आहे. या घटनेत नायगांव पोलिसांनी खलील कुरेशी रा. पिंपळगाव, मगदूम कुरेशी रा. नायगाव, तौफिक कुरेशी रा. नायगाव, अजीम कुरेशी रा. नायगांव या चार जनांच्या विरुद्धात नायगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असल्याची माहिती परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक किरण यांना पोपळघट यांनी दिली आहे.परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक किरण पोपळघट यांच्या नेतृत्वाखाली नायगांव शहरातील कत्तलखान्यावर करण्यात आलेल्या या कारवाईचे स्वागत होत असून अशा अवैध धंद्या विरोधातील कारवाई करून नायगाव पोलिसांनी अवैध धंदेवाल्याचे मुसक्या आवळल्याने जनतेतून कौतुक होत आहे..

Img 20250517 Wa0008
Img 20250517 Wa0008

विभागीय पोलीस अधिकारी पोपळघट यांना नायगाव शहरात मटका ,तिरट ,क्लब ,अवैद्य देशी दारू विक्री, गुटका , अशा एक ना अनेक समस्या नायगाव शहरात चालू असताना यांना ही गुप्त माहिती मिळत नाही का . केवळ कत्तलखान्यावर गोवंश मास विक्री करत असल्याचीच गुप्त माहिती मिळाली आहे का? ते तर ओपन मास विक्री करत असल्याचे चित्रात दिसत आहे. मग गुप्त माहितीचा विषय येतोच कुठे अशी चर्चा नायगाव शहरातील नागरिक करत आहेत.या प्रकरणाची उच्चस्तरीय वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी करावी अशी चर्चा नायगावात होत आहे. .

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button