Latest Newsआपला जिल्हानांदेडमहाराष्ट्र

27 सप्टेंबर शनिवार रोजी नांदेड जिल्ह्यातील सर्व शाळा महाविद्यालय यांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. 

रघुनाथ सोनकांबळे नायगाव….

 

    प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र. मुंबई यांनी दिलेल्या पूर्वसूचनेनुसार नांदेड जिल्ह्यात 27 सप्टेंबर 2025 रोजी ऑरेंज अलर्ट जरी केलेला असून जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. सध्या स्थित नांदेड जिल्ह्यातील सर्व सिंचन प्रकल्प पूर्णपणे भरलेले असून सर्व नद्यांमध्ये पाण्याचा विसर्ग चालू आहे. तसेच जिल्ह्यातील प्रमुख नद्यांनी इशारा पातळी गाठलेली असल्याने नांदेड जिल्ह्यातील अनेक भागात पूर परिस्थिती निर्माण होऊ शकते.
नांदेड जिल्ह्यात कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडवू नये तसेच अतिवृष्टीमुळे आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास त्याचा परिणाम शालेय विद्यार्थ्यांवर होऊ नये याकरिता जिल्ह्यातील सर्व शाळा महाविद्यालय अंगणवाडी पूर्व प्राथमिक व माध्यमिक माध्यमिक महाविद्यालय यामधील विद्यार्थ्यांना 27 सप्टेंबर 2025 रोजी सुट्टी असणे आवश्यक असल्याने जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण नांदेड जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी सरकारी व खाजगी प्राथमिक व माध्यमिक शाळा जिल्ह्यातील जिल्हा परिषद नगरपालिका शाळा अनुदानित व विनाअनुदानित शाळा सर्व आश्रम शाळा सर्व महाविद्यालय खाजगी शिकवणी तसेच आयुक्त व्यवस्थापन प्रशिक्षण केंद्र यांच्या आस्थापनेवरील शैक्षणिक संस्थांना  27 सप्टेंबर  रोज शनिवारी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. याची नोंद जिल्ह्यातील सर्व शिक्षक संस्थांनी घ्यावी.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button