श्रीकाशी अन्नपूर्णा आर्य वैश्य वृद्धाश्रम व नित्यानंसत्रम शिर्डी येथे भावीक भक्तांसाठी माफक दरात उत्तम सोइयुक्त राहण्यासाठी असल्यामुळे वासवी भवन प्रसिद्ध असल्यामुळे भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे.
भारतात प्रसिद्ध असलेल्या श्रीकाशी अन्नपूर्णा आर्य वैश्य वृद्धाश्रम व नित्यानंसत्रम या ट्रस्टच्या वतीने आर्य वैश्य समाजातील गोरगरीब होतकरू हुशार मेरिट विद्यार्थ्यांना शैक्षणिक शिष्यवृत्ती व शिक्षणासाठी डोनेशन देणे आदी विविध समाज उपयोगी कार्यक्रम राबवत असते तसेच शिर्डी. तिरुपती. वाराणसी येथे दोन धर्मशाळा. हरिद्वार. श्रीशैलम येथे धर्मशाळेचे बांधकाम चालू आहे. प्रत्येक धर्मशाळेत आर्य वैश्य सत्रम मध्ये येणाऱ्या सर्व भक्तांना राहण्याची तसेच रुचकर नाष्टा व प्रसादरूपी जेवणाची उत्तम सोय करण्यात आली आहे.
श्री काशी अन्नपूर्णा आर्य वैश्य वृद्धाश्रम व नित्यांनसत्रमच्या वतीने चेअरमन टी जी वेंकटेश. अध्यक्ष भावनासी श्रीनिवास.सचिव बच्चू विलास गुप्ता. कोषाध्यक्ष नंदकुमार गादेवार. उपाध्यक्ष साईनाथ मेडेवार .कोर कमिटी सदस्य राजेश्वर उत्तरवार, गजानन चिद्रावार,यांच्या सर्व सदस्यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व तीर्थक्षेत्रात ट्रस्ट समाज उपयोगी कार्यात कारभार योग्य रीतीने व्हावा म्हणून विशेष लक्ष असते.
शिर्डी येथील धर्म शाळेत प्रशासकीय अधिकारी प्रकाश यांचे विशेष निवड करण्यात आली आहे. भाविकांचे श्रद्धास्थान समजले जाणाऱ्या शिर्डी येथे निसर्गरम्य वातावरणात भाविक भक्तांना राहण्यासाठी टोले जंग चार मजली वातानुकूलित व बिगर वातानुकूलित 220 रूमची उत्तम सोइयुक्त .सेक्युरिटीसह इमारत असल्याने या ठिकाणी मोफत नाश्ता .जेवण.कॉफी चहा .शुद्ध पिण्याच्या पाण्याची, लिफ्टची सोय कन्यका परमेश्वरी वासवी मातेचे भव्य दिव्य मंदिर भाविकांना दर्शनासाठी बांधण्यात आले असल्यामुळे या ठिकाणी भाविक राहण्यासाठी गर्दी करीत आहेत.
कारण शिर्डीमध्ये पंचतारांकित सह विविध लॉजिंग हॉटेल मध्ये मोठ्या प्रमाणात राहण्यासाठी जेवण नाश्तासाठी मोठ्या प्रमाणात पैसे मोजावे लागत असल्यामुळे काशी अन्नपूर्णा सत्रम येथे प्रत्येक भाविक राहण्यासाठी येथे पसंती दर्शवित असून या ठिकाणचे वातावरण बघून त्याला मोहित होत असल्याने ट्रस्टच्या कारभाराबद्दल सर्व स्तरातून व भावीकातुन कौतुक व आनंद व्यक्त केल्या जात आहे.