नायगाव उपडाकघर नूतन ईमारतीचा लोकार्पण सोहळा खा. रवींद चव्हाण यांच्या हस्ते खा. डॉ. अजित गोपछडे यांच्या उपस्थितीत पार पडला..

. रघुनाथ सोनकांबळे नायगाव.दि.(२७) बऱ्याच वर्षापासून चा डाकघर इमारतीचा प्रश्न ऐरणीवर होता. तो एक ना एक कारणाने नायगाव कराच्या चर्चेत असायचा . डाकघर स्थापनेपासून ते आज पर्यंत डाकघर भाड्याच्या इमारतीत होते. नायगाव शहरातील शहराच्या मध्यवर्ती वसाहतीत असणारे डाकघर अनेकदा जन आंदोलनात जाळण्यात आले. तो प्रसंग लक्षात घेऊन शहरातील डाकघर हे नरसी या ठिकाणी हलवण्याचा संबंधित अधिकाऱ्यां कडून प्रस्ताव वरिष्ठांना सादर करण्यात आला होता. स्थलांतरित होत असलेले डाकघर हे स्थलांतरित होऊ नये म्हणून येथील लोकमतचे प्रतिनिधींनी वहाबुदिन शेख यांनी आपल्या लेखणीतून आवाज उठवला व स्थलांतरित होणारे डाकघर शहरातच असावे यासाठी त्यांनी प्रयत्न केले.

.त्यातच स्थानिक लोकप्रतिनिधीकडून व गावकऱ्यांकडून पाठपुरावा सुरू झाला आणि तत्कालीन सरपंच माधवरावजी आप्पा बेळगे व उपसरपंच श्रीनिवास पाटील चव्हाण यांनी डाक घराच्या इमारतीच्या जागेचा प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेऊन शहरातील जवळजवळ दोन ते तीन ठिकाणच्या जागा संबंधित अधिकाऱ्यांना दाखवण्यात आल्या व त्यापैकी मध्यवर्ती शहरातील जवळजवळ 3000 स्क्वेअर फुट ची जागा सदर कार्यालयास तत्कालीन सरपंच उपसरपंचांनी उपलब्ध करून दिली. जागा उपलब्धते नंतर सदर जागेवर डाकघरची इमारत भव्य दिव्य बांधण्याचा संकल्प हाती घेउन तत्कालीन आमदार व नायगाव शहराचे भाग्यविधाते वसंतराव चव्हाण यांच्या पुढाकाराने सदर इमारतीचा पायाभरणीचा कार्यक्रम करण्यात आला.

. भूमिपूजन झाल्यानंतर जेवढ्या लवकर होईल त्या पद्धतीने सदर जागेवर इमारत उभा करण्याचा प्रयत्न संबंधित अधिकाऱ्यांकडून व गुत्तेदारांकडून करण्यात आला असून आज ती वास्तू पूर्णपणे तयार होऊन सज्ज झाली आणि त्या नूतन वास्तूत नुसते डाकघर च नसून नायगाव शहराचा व तालुक्याचा विचार करून संबंधित अधिकाऱ्याने व येथील पुढार्याने पाठपुरावा करून उपडाक घराचा दर्जा या ठिकाणी मिळून घेतला. व आज मोठ्या थाटात नांदेड जिल्ह्याचे लोकप्रिय खा. रवींद्र पाटील चव्हाण यांच्या हस्ते व राज्यसभेचे सदस्य खा.डॉ. अजित गोपछडे यांच्या उपस्थितीत या उप डाकघर नूतन इमारतीचे मोठ्या थाटात आज लोकार्पण सोहळा पार पडला.

. या उद्घाटन प्रसंगी नांदेड जिल्ह्याचे खा. रवींद्र पाटील चव्हाण यांनी नायगाव शहरात विकास होत असताना उपडाघर नूतन इमारत या ठिकाणी उपलब्ध होऊन तिचा लोक आपण सोहळा थाटात संपन्न झाला .त्याचप्रमाणे या परिसरातील नागरिकांच्या वेगवेगळ्या समस्या सुद्धा याच डाकघरातून सोडवल्या जाव्यात त्यात प्रामुख्याने जिल्ह्यावर जिल्हा डाकघरातून मिळणारे पासपोर्ट जर या नूतन इमारतीतील उपडाकघरातून देण्याची सुविधा निर्माण झाली तर या परिसरातील नायगाव सह मुखेड बिलोली देगलूर धर्माबाद उंमरी या तालुक्यातील नागरीकांचे प्रश्न या ठिकाणी सुटतील अशी मागणीच राज्यसभा खा. डॉ. गोपछडे यांच्यासमोर मांडण्यात आली..
खा.रविद्र चव्हाण यांच्या मागणीला डॉ.खा. गोपछडे यांनी सकारात्मक उत्तर देत नायगाव शहर व चव्हाण कुटुंब यांचे संबंध आणि माझे संबंध अति जिव्हाळ्याचे असून पक्ष कोणताही असो जेव्हा विकासाच्या दृष्टिकोनातून चव्हाण कुटुंब समोर येते तेव्हा विकास कामाची दूरदृष्टी असते म्हणूनच आज नायगाव शहरात दिवंगत खा. वसंतराव चव्हाण यांच्यानंतर त्यांचे स्वप्न साकार करण्यासाठी मी राज्यसभेवर गेलो की काय? असेही माझ्या मनाला वाटते .म्हणून नायगाव शहराचा विकास व परिसराचा विकास करण्यासाठी मी सदैव आपल्या चव्हाण कुटुंबासोबत आहे. नायगाव शहर हे भविष्यात ग्लोबल सिटी करण्याच्या दृष्टिकोनातून आपण दोघांनीही मिळून काम करू असा विश्वास नायगावकर च्या समोर डॉ. खा. गोपछडे यांनी व्यक्त करत आज लोकार्पण झालेल्या उपडाकघरच्या इमारतीतून होत असलेले काम नुसते टपालापुरते नसून ते आज देशात बँकिंगच्या क्षेत्रातही मोठे यश मिळवले असून देशातील नागरिकांनी या डाक विभागाला दुसऱ्या क्षेत्रापेक्षा मोठे झुकते माप दिले. त्यात वेगवेगळ्या जनहितकारी योजना नागरिकांच्या कुटुंबांसाठी राबवल्या जात असून त्याचा लाभ सुद्धा मोठ्या प्रमाणात गोरगरीब कुटुंब घेत असताना दिसत आहेत.

. याप्रसंगी नायगाव नगरपंचायतीचे नगर उपाध्यक्ष विजय पाटील चव्हाण यांनीही आपल्या मनोगतातून नायगाव शहराच्या विकासासाठी दोन्ही खासदारांना विनंती केली की आज पर्यंत आम्हाला शासनाकडून कुठलाही निधी उपलब्ध झाला नसल्याने अनेक विकास कामे रखडली आहेत. तसेच शहरातील घरकुलांच्या निधी संबंधीचा प्रश्न सुद्धा उपस्थित करून त्यासाठी सुद्धा आपण निधी उपलब्ध करून द्यावा अशी विनंती केली आहे.

या कार्यक्रमास नायगाव शहराच्या नगराध्यक्ष सौ. अर्चना चव्हाण, नायगाव तहसीलचे तहसीलदार सौ.धम्मप्रिय गायकवाड माजी जिल्हा परिषद सदस्य माधवरावजी बेळगे, नगरसेवक पंकज पाटील चव्हाण, माजी नगराध्यक्ष पंढरी भालेराव, शरद भालेराव, विजय भालेराव, नारायण जाधव, यांच्यासह संबंधित विभागाचे व्ही यु कुलकर्णी ,ए एस पीएच क्यू, अरुण गायकवाड सहाय्यक डाक अधीक्षक, सहाय्यक डाक अधीक्षक योगेश काटोले, कंप्लेंन अधिकारी भागवत मुंडे, आय पी सिविलिंग यंगुलवार, जी व्ही स्वामी, डी के पवार, बळवंत पाटील शिंदे, साई दबडे, पि के पवार ,कैलास बडूरवार, डी एन.नारे भोसीकर, डुकरे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अधीक्षक मोहम्मद खदीर यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी विजया श्रीमंगले मॅडम, जी. बी भिलवंडे ,उमेश पाटील कानगुले, यांच्यासह नायगाव, गडगा, मुखेड ,शंकर नगर ,बिलोली या कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले ,कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अक्षय कुलकर्णी, किरण डांगे मॅडम यांनी केले तर आभार व्ही यु कुलकर्णी ऑफिस सुप्रीडंट यांनी मानले.



