Latest Newsमहाराष्ट्र

अनिसच्या राज्यव्यापी अधिवेशनात विश्वनाथ मुडपेगुरुजींचा आळंदी येथे सन्मान…….

शंकर बोईनवाड उदगीर..दि..(२८)    डॉ. नरेंद्र दाभोळकर स्थापित महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीव विवेक जागर संस्था तर्फेआळंदी येथे एक दिवशीय संविधान राष्ट्रीय परिषद घेण्यात आली. महाराष्ट्र अनिसच्या राज्यव्यापी अधिवेशनात,
परिवर्तनवादी चळवळीत गेल्या 35 वर्षापासून सातत्याने,समर्पित भावनेने  कार्य करीत असल्याबद्दल, गुजरातच्या मानवी अधिकार समितीचे प्रख्यात सामाजिक नेते डॉक्टर मार्टिन मकवाना यांच्या हस्ते विश्वनाथ मुडपे यान्चा सपत्निक(भागीरथा मुडपे) सन्मान पदक प्रदान करण्यात येऊन सत्कार संपन्न झाला.

यावेळी महाराष्ट्र राज्यअनिसचे अध्यक्ष अविनाश पाटील,राज्य कार्याध्यक्ष माधव बावगे,रुकसाना मुल्ला, अनिल दरेकर
उत्तरेश्वर बिरादार, बाबुराव माशाळकर ,प्राचार्य विजयकुमार पाटील, ज्येष्ठ गांधीवादी नेते प्राचार्य डॉक्टर सोमनाथ रोडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त विश्वनाथ मुडपेगुरुजींनी अनिसच्या भानामती प्रबोधन यात्रा, संविधान जागृती अभियान, पर्यावरण सुधारण्यासाठी फटाके मुक्तदिवाळीअभियान,व्यसनमुक्तीसाठी दारू नको दूध प्या, शैक्षणिक व सामाजिक परिवर्तनासाठी सातत्त्याने सहभाग नोंदविला. उदगीर शहरातील परिवर्तनवादी व विज्ञानवादी चळवळीत काम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचा हा सन्मान आहे. त्यांचा प्रतिनिधी म्हणून मी हा सन्मान स्वीकारत आहे असे गुरुजी म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button