Latest Newsआपला जिल्हानांदेडनायगांव

नायगावातील बहुचर्चित गट क्रमांक 418 मधील बनावट शेतीपीक नोंद प्रकरणाची चौकशी सुरू;   अवसायक ना.जि.क्र.औ.से.स.सो.लि. र्यालयाकडून अहवाल मागवला..

नायगाव तालुका विषेश प्रतिनिधी……

नायगाव तालुक्यातील गट क्रमांक 418/स.न.128/सी. संदर्भातील कथित खोट्या शेतीपीक नोंद प्रकरणाची गंभीर दखल घेत तहसील कार्यालय नायगाव (खै.) यांनी संबंधित प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.
Screenshot 20260508 182634 Gallery
Screenshot 20260508 182634 Galleryया संदर्भात नांदेड जिल्हा  कृषी औ.स. से.स.सो.लि.नादेड ,  यांना पत्र पाठवून उपलब्ध कागदपत्रांसह सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

प्राप्त माहितीनुसार, संबंधित जमिनीवर इ.स. १९६७ पासून गोदामाचे बांधकाम असून त्या ठिकाणी प्रत्यक्ष शेती होत नसल्याचे व नॉन अग्रिकल्चरल असल्याचे नमूद करण्यात आले आहे. असे असतानाही तत्कालीन तलाठ्यांकडून सन २०२१-२२ व २०२२-२३ या कालावधीत या क्षेत्रात तूर व गहू पिकांची नोंद दाखविण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. या नोंदीच्या आधारे संबंधित शेतमालकांना खोटे पीक प्रमाणपत्र देण्यात आल्याची बाब समोर आली आहे.

या प्रकरणी पत्रकार तथा भीमशक्ती संघटनेचे नांदेड जिल्हा उपाध्यक्ष रघुनाथ सोनकांबळे यांनी तक्रार दाखल केली होती. त्यानंतर मंडळ अधिकारी, नायगाव यांच्याकडून संबंधित गटातील वस्तुनिष्ठ अहवाल मागविण्यात आला होता. सदर प्रकरणातील अहवाल सादर केल्यानंतर तहसील प्रशासनाने पुढील चौकशीची प्रक्रिया सुरू केली आहे.

तहसीलदारांनी अवसायक नांदेड जिल्हा कृषी औद्योगिक सर्व सेवा सहकारी सोसायटी लिमिटेड नांदेड यांना दिलेल्या पत्रात असे नमूद केले आहे की, नायगाव येथील गट क्रमांक 418 मधील खोट्या पीक नोंदी संबंधित प्रकरणात वस्तुस्थिती पडताळणी करून उपलब्ध कागदपत्रांच्या आधारे स्पष्ट अहवाल सादर करावा, जेणेकरून पुढील प्रशासकीय कारवाई करणे सोयीचे होईल.

या प्रकरणामुळे महसूल विभागातील नोंदींची विश्वासार्हता आणि तलाठी स्तरावरील कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, दोषींवर महसूल प्रशासकीय स्तरावर कारवाई होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button