महाराष्ट्र

डिजीटल मीडिया परिषदेच्या लातुर जिल्हाध्यक्षपदी बिभीषण मद्देवाड यांची निवड

 

मुंबई….

मुंबई – दि – 15 – अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न डिजीटल मीडिया परिषदेच्या लातुर जिल्हाध्यक्षपदी बिभीषण मद्देवाड यांची निवड जाहीर करण्यात आली. अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त मा.श्री.एस.एम. देशमुख सर यांच्या आदेशाने डिजिटल मीडिया परिषदेचे प्रदेशाध्यक्ष अनिल वाघमारे यांनी बिभीषण मद्देवाड यांची डिजिटल मीडिया परिषदेच्या लातुर जिल्हाध्यक्षपदी निवड जाहीर केली. अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त मा.श्री.एस.एम.देशमुख सर यांच्या हस्ते व डिजिटल मीडिया परिषदेचे प्रदेशाध्यक्ष अनिल वाघमारे, मराठी पत्रकार परिषदेचे विभागीय सचिव सचिन शिवशेट्टे,पत्रकार सिद्धार्थ सुर्यवंशी यांच्या उपस्थितीत संपादक बिभीषण मद्देवाड यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.

 

अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त मा.श्री.एस.एम.देशमुख सर यांचे हात बळकट करण्यासाठी तसेच मराठी पत्रकार परिषदेच्या विविध विषयांचे राज्यभरात डिजिटल मिडियाचे नेटवर्क राबविण्यात येत आहे. मराठी पत्रकार परिषदेच्या विविध कार्यक्रमांचे यु ट्यूब चॅनल, पोर्टल, फेसबुक पेज लाईव्ह वर थेट प्रक्षेपण करुन मराठी पत्रकार परिषदेचे डिजिटल नेटवर्किंग करावे. तसेच तळागाळातील पत्रकारांना आपल्या डिजिटल मिडिया परिषदेच्या सोबत जोडणे आवश्यक आहे. यासह इतर जबाबदाऱ्या श्री. बिभीषण मद्देवाड यांच्या वर सोपवण्यात आल्या आहेत. त्यांची डिजिटल मिडिया परिषदेच्या लातुर जिल्हाध्यक्षपदी नव्याने निवड झाल्याबद्दल अभिनंदन करुन शुभेच्छा देण्यात आल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button