Latest Newsआपला जिल्हानांदेडनायगांव

नायगाव येथील शरदचंद्र महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी : प्रो. डॉ . बलभीम वाघमारे यांची नियुक्ती……

रघुनाथ सोनकांबळे…….

नायगाव बा. येथील शरदचंद्र कला , वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या  प्राचार्य पदी राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख प्रो.डॉ .बलभीम वाघमारे यांची संस्थेचे अध्यक्ष खा.रवींद्र वसंतराव चव्हाण यांनी त्यांची नियुक्ती केली आहे .   डॉ . वाघमारे यांना  संस्थेचे सचिव  केशवराव बळवंतराव चव्हाण यांनी  शाल व पुष्पहार देऊन  मावळते प्राचार्य डॉ .हारी बाबु    यांच्याकडून   पदभार देण्यात आला . यावेळी संस्थेचे संचालक  माधवराव बेळगे हे उपस्थित होते . मावळते प्राचार्य डॉ . के .हरीबाबू हे नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाल्यामुळे त्यांच्या जागी संस्थेने प्रो.डॉ .बलभीम जे .वाघमारे यांची नियुक्ती केली . प्रो. डॉ.बलभीम वाघमारे हे या महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभागात मागील 34 वर्षापासून कार्यरत आहेत.त्यांनी अनेक समाज प्रबोधन पूरक व्याख्याने दिली असून त्यांचा पिंड हा समाजसेवेचा राहिला आहे .

 

सदरील कार्यक्रमास मावळते प्राचार्य डॉ.के हरीबाबू , उपप्राचार्य डॉ . श्याम पाटील प्रो. डॉ .श्रीरंग वट्टमवार IQAC समन्वयक डॉ. सिद्दिकी एम. एस .NAAC डॉ.एस.एस.अंजनीकर माजी कार्यालयीन अधीक्षक  .प्रशांत बिलोनीकर व महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते . या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा .डॉ . गोविंद रा .परडे यांनी केले ,तर आभार हिंदी विभाग प्रमुख प्रो. डॉ .श्रीरंग वट्टमवार यांनी मानले .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button