महाराष्ट्रराजकीय

मुंबई महापालिकेत काँग्रेस–वंचित युतीचा ऐतिहासिक डाव; वॉर्ड १५२, १४० व १५० मधून हंडोरे–बनसोडे–शेंडकर यांची उमेदवारी जाहीर

रघुनाथ सोनकांबळे,…

मुंबई…

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व वंचित बहुजन आघाडी युतीने मोठा राजकीय संदेश देत वॉर्ड क्रमांक १५२ व १४० मधून अधिकृत उमेदवारी जाहीर केली आहे. काँग्रेस महिला अध्यक्ष प्रज्योती हंडोरे, भीमशक्ती मुंबई प्रदेश अध्यक्ष शशिकांत बनसोडे तसेच हंडोरे साहेबांच्या ‘होम पीच’ मानल्या जाणाऱ्या वॉर्ड क्रमांक १५० मधून वैशाली शेंडकर यांना युतीची उमेदवारी मिळाल्याबद्दल सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

संविधानप्रेमी जनतेला गेल्या अनेक निवडणुकांपासून अपेक्षित असलेली काँग्रेस–वंचित युती यावेळी प्रत्यक्षात अवतरल्याने धर्मांध शक्तींविरोधातील मतविभागणी टळणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. युतीच्या या निर्णयामुळे मुंबईच्या राजकारणात नवचैतन्य निर्माण झाले असून, सामाजिक न्याय, संविधानिक मूल्ये व सर्वसमावेशक विकासाचा मुद्दा केंद्रस्थानी येण्याची शक्यता बळावली आहे.

प्रज्योती हंडोरे, शशिकांत बनसोडे व वैशाली शेंडकर हे तिन्ही उमेदवार आपल्या-आपल्या प्रभागात दीर्घकाळ मतदारांशी असलेले घट्ट नाते, केलेली विकासकामे आणि जनसामान्यांशी थेट संवाद यामुळे ओळखले जातात. यासोबतच खासदार चंद्रकांत हंडोरे व माजी नगरसेविका संगीताताई हंडोरे यांचे मार्गदर्शन, आशीर्वाद व सक्रिय साथ ही या तिघांच्या उमेदवारीची मोठी जमेची बाजू मानली जात आहे.

मुंबई महानगरपालिकेतील नगरसेवकाचे महत्त्व हे इतर भागातील आमदारांइतकेच असल्याचे राजकीय विश्लेषक सांगतात. कारण मुंबई महानगरपालिका व महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प जवळपास समकक्ष मानला जातो. त्यामुळे या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.

युतीच्या या तीन उमेदवारांना सर्व स्तरांतून हार्दिक शुभेच्छा देण्यात येत असून, मुंबई महापालिकेच्या राजकारणात हे तिघेही हंडोरे दांपत्याच्या नावलौकिकात भर घालतील, असा विश्वास समर्थकांकडून व्यक्त केला जात आहे.
युतीचा हा प्रयोग मुंबईच्या राजकारणात नवी दिशा देणारा ठरेल, यात तिळमात्र शंका नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button