आपला जिल्हानांदेडराजकीय
राष्ट्रवादीत मेगाभरती! नांदेडच्या राजकारणात मोठा भूकंप – कागडे व कदम यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश

रघुनाथ सोनकांबळे
नांदेड जिल्ह्याच्या राजकारणात आज मोठी उलथापालथ घडवत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ताकद दाखवून दिली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे , प्रदेश महिला अध्यक्षा सौ. रुपालीताई चाकणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच नांदेड जिल्ह्याचे लोकप्रिय आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर व माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली माजी जिल्हा परिषद सदस्या डॉ. मिनाक्षीताई शिवाजी कागडे आणि माजी सरपंच राजेश घडलिंग कदम यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला.
या धडाकेबाज प्रवेशामुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरणे हादरली असून राष्ट्रवादी काँग्रेसची संघटनात्मक ताकद अधिक भक्कम झाली आहे. जनतेच्या प्रश्नांशी बांधिलकी ठेवणारा, विकासाचा झेंडा हाती घेणारा पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसकडे पाहिले जाते, याचीच ही पावती असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.



