येथून जवळच असलेल्या पाळा येथील रहिवासी जेष्ठ महीला चंद्राबाई सदाशिव टोकलवाड (भुरके) वय ८२ वर्ष यांचे आज दि.२३ मे २०२५ रोजी शुक्रवारी सकाळी ८ वाजता निधन झाले . त्यांच्या पश्चात चार मुलं, एक मुलगी,जावाई, सुना , नातू असा मोठा परिवार आहे. त्या ओड समाजाचे प्रांत अध्यक्ष बालाजीराव मसलगेकर यांच्या सासू होत.
स्व. चंद्राबाई टोकलवाड यांच्यावर आज दि. २३ मे रोजी दुपारी २:३० वाजता पाळा तालुका मुखेड जि.नांदेड येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. चंद्राबाई टोकलवाड अतिशय मनमिळाऊ स्वभावाच्या होत्या. अंत्यविधीस गावातील नागरिक, पाहुणे, मित्र मंडळी उपस्थित होते.