Latest Newsआपला जिल्हाक्रीडानांदेडनायगांव
नायगाव तालुकास्तरीय पावसाळी क्रीडा स्पर्धा संपन्न..व्हॉलीबॉल स्पर्धेत शालेय खेळाडूंचा उत्स्फूर्त सहभाग….

रघुनाथ सोनकांबळे..नायगाव..
युवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नांदेड व तालुका क्रीडा अधिकारी कार्यालय नायगाव यांच्या संयुक्त विद्यमाने नायगाव येथील शासकीय निवासी शाळेत तालुकास्तरीय पावसाळी क्रीडा स्पर्धा यशस्वीरीत्या संपन्न झाल्या.

या स्पर्धेमध्ये मुला-मुलींच्या व्हॉलीबॉल गटात तालुक्यातील विविध शाळांनी सहभाग घेतला. कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा परिषद हायस्कूल घुंगराळा येथील मुख्याध्यापक आदरणीय बोरगावे सर होते. प्रमुख पाहुण्यांमध्ये कोमावार सर, कै. मोहनराव देशमुख हायस्कूल सुजलेगावचे मुख्याध्यापक आनेराये सर, महादवाड सर, तसेच पंच म्हणून मुडंकर सर, बाचकलवाड सर, सचिन तेहरा सर, सोनटके सर, काळेवार सर, कंदुरके सर आदी मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेतील विजेतेपद .. १७ वर्षे मुलींचा गट : प्रथम – रामचंद्र हायस्कूल गौरी शेळगाव, द्वितीय – माध्यमिक आश्रम शाळा कुंटूर.१९ वर्षे मुलींचा गट : प्रथम – वि.जा.भ.ज. ज्युनिअर कॉलेज कुंटूर तांडा.१४ वर्षे मुले गट : प्रथम – माध्यमिक आश्रम शाळा कुंटूर तांडा, द्वितीय – जिल्हा परिषद हायस्कूल घुंगराळा.१७ वर्षे मुले गट : प्रथम – माध्यमिक आश्रम शाळा मरवाळी तांडा, द्वितीय – जिल्हा परिषद हायस्कूल मांजरम.१९ वर्षे मुले गट : प्रथम – शासकीय निवासी शाळा नायगाव.



