Latest Newsआपला जिल्हानांदेडबिलोली

आईनंतर पत्नीला आघाडीकडून उमेदवारी — 2011 ची पुनरावृत्ती होणार? कपबशी पुन्हा लक्की निशाणी!

रघुनाथ सोनकांबळे

नायगाव….

बिलोली शहर विकास आघाडीने प्रभाग क्र. ९ मधून पत्रकार महेंद्र गायकवाड यांच्या पत्नी अनुपमा महेंद्र गायकवाड यांना उमेदवारी जाहीर केली असून, या निर्णयानंतर शहरात 2011 च्या राजकीय घडामोडींची आठवण पुन्हा ताजी झाली आहे. कारण, याच आघाडीकडून सन 2011 मध्ये महेंद्र गायकवाड यांच्या मातोश्री वच्छलाबाई भिमराव गायकवाड यांना उमेदवारी देण्यात आली होती आणि त्या प्रचंड मताधिक्याने विजयी झाल्या होत्या.
यावेळी विशेष योगायोग असा की त्या वेळेसही “कपबशी” हीच निशाणी होती आणि आता अनुपमा गायकवाड यांनाही तीच कपबशी निशाणी मिळाल्याने “उमेदवार बदलला, निशाणी तीच” अशी चर्चा मतदारांत रंगू लागली आहे. कपबशी हीच गायकवाड परिवारासाठी लक्की ठरणार का? असा प्रश्न प्रभागात सर्वत्र चर्चेत आहे.
मराठवाडा जनहित पार्टी प्रणित बिलोली शहर विकास आघाडीचे नेते व नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संतोष कुलकर्णी यांनी सामाजिक, शैक्षणिक भान असलेल्या अनुपमा गायकवाड यांच्यावर विश्वास ठेवत ही उमेदवारी दिली आहे. पत्रकार संरक्षण समितीचे जिल्हाध्यक्ष असलेल्या महेंद्र गायकवाड यांचे सामाजिक कार्य, पत्रकारितेतले योगदान यामुळेही अनुपमा गायकवाड यांच्या उमेदवारीस पाठबळ वाढल्याचे मानले जात आहे.

प्रभागात त्यांच्यासोबत अनुभवी उमेदवार अनुप अंकुशकर असून, त्यांनी डोअर टू डोअर प्रचारातून मतदारांची विश्वासार्हता मिळवली आहे.

2011 मध्ये वच्छलाबाई गायकवाड यांनी मिळवलेल्या मोठ्या मताधिक्याची पुनरावृत्ती यावेळीही पत्नी अनुपमा गायकवाड करणार का? या प्रश्नावर मतदारांमध्ये मोठी चर्चा सुरु आहे. अनुसूचित महिला राखीव असलेल्या जागेवर आघाडीने पुन्हा गायकवाड कुटुंबावर विश्वास ठेवला असून, “आईनंतर आता पत्नी निवडून येणार” अशी शक्यता मतदारांमध्ये व्यक्त होत आहे.
कपबशीची लक्की निशाणी, मातोश्रींचा भक्कम विजय आणि पुन्हा मिळालेली उमेदवारी — या तिन्ही कारणांमुळे 2011 ची राजकीय पुनरावृत्ती पुन्हा घडणार का? याकडे बिलोली शहराचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button