Latest Newsआपला जिल्हानांदेडनायगांव

नायगांव शहरामध्ये 37 किलो प्लास्टिक जप्त : 60 हजार दंड वसूल नगरपंचायत ची कारवाई…!

 

नायगाव  प्रतिनिधी

केंद्रीय व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून निर्देशित करण्यात आलेल्या एकल प्लास्टिक वापर बंदी अंमलबजावणी मोहिमेच्या अनुषंगाने मंगळवार दि.29 एप्रिल 2025 रोजी नायगांव शहरामध्ये विविध ठिकाणी छापे टाकून 37 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले आणि 60 हजार रुपये दंड आकारण्यात आला.

जे 11 दुकानदार दंड भरला नाही त्यांच्यावर पोलिस स्टेशन नायगांव येथे गुन्हे दाखल करुन दंडाची रक्कम त्यांच्या मालमत्ता करामध्ये समाविष्ठ करण्यात येणार आहे.
प्लास्टिक बंदीचा कायदा झाल्यापासून प्लास्टिकच्या वापराबाबत जागरुकता निर्माण झाली आहे. मोठ्या दुकानांमध्ये आणि कापड दुकानांमध्ये आता थेट कापडी पिशव्या किंवा कागदांच्या पिशव्या वापरण्यात येत आहेत. तसेच बंदी नसलेल्या जाड पिशव्या वापरण्यात येत आहेत. प्लॅस्टिक बंदी पासून नायगांव नगरपंचायतीने वेगवेगळ्या मोहीम राबवून जनजागृती केली. एवढे करूनही अनेक किरकोळ व्यापारी प्लास्टिक कॅरीबॅग उपयोगात आणत आहेत. वर्षातून अनेक वेळा अशा व्यापाऱ्यांकडील कॅरीबॅग जप्त करून दंडाची आकारणी करण्याची वेळोवेळी मोहीम राबविण्यात येते.

त्यानुसार मंगळवारी 29 एप्रिल रोजी नायगांव नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी गंधाली पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यालयीन अधिक्षक गजानन कदम, पाणी पुरवठा अभियंता सनोबर तसनीम, कर व प्रशासकीय अधिकारी अर्जुन गव्हाणे, माया वाघमारे, प्र.स्वच्छता निरीक्षक अजय सुर्यवंशी, रामेश्वर बापुले, संभाजी भालेराव, श्रीधर कोलमवार, गणेश चव्हाण, उमेश कांबळे, शेख मौला, बालाजी बोईनवाड, धनराज वरणे, श्रीराम बेळगे, श्रीकांत वडगांवकर, साहेबराव चिंचोले, रमेश चव्हाण, भिमा गोवंदे, दिलिप वाघमारे, प्रथमेश भालेराव, प्रविण भालेराव, सुप्रिया रोडे या सर्व कर्मचा-यांनी ही मोहिम पार पाडली. या पुढे दर आठवड्यात एक दिवस अशीच प्लास्टिक जप्तीची मोहीम राबविण्यात येणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button