
देगलुर ता. प्रतिनिधी ..दि.( २३) देगलूर तालुक्यातील शहापुर येथे भारतीय राष्ट्रीय उपभोक्ता सहकारी संघाकडून सोयाबीन ची खरेदी 24 ऑक्टोबर पासून नुकतेच सुरू करण्यात आले आहे.

आतापर्यंत या केंद्रावर 16,000 क्विंटल सोयाबीन’ची खरेदी झाली असून यापैकी 10,000 क्विंटल सोयाबीन’चे पेमेंट संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले आहे उर्वरित शेतकऱ्यांना पण विना विलंबाने रक्कम मिळावेत याबाबत नाफेड दक्षता घेत आहे असे कारभारी सर्वोदय शेतकरी उत्पादक कंपनीचे नामदेव रेड्डी ईलतेपवार यांनी पत्रकारांना सांगितले.

स्थानिक केंद्रावर तब्बल 22,000 शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीसाठी ऑनलाईन नोंदणी केले आहेत .या खरेदी केंद्रावरून शेतमालाची वाहतूक मंद गतीने होत असल्यामुळे जागेचे प्रश्न जडील बनल्याचे दिसून येत आहे .तेव्हा संबंधित विभागाने खरेदी केलेल्या शेतमालाची वाहतूक लवकरात लवकर करावी अशी मागणी स्थानिक व परिसरातील शेतकऱ्यांकडून होत आहे.



