Latest Newsआपला जिल्हानांदेडनायगांव

गाडगे बाबांचे विचार राष्ट्रीय कार्यात माणसाला प्रेरणादायी घडवू शकतात तरुणाने गाडगेबाबांच्या विचारांची प्रेरणा घ्यावी… यशपाल भिंगे

कुंटूर प्रतिनिधी..दि..(१८)
नायगाव तालुक्यातील कुंटूर परिसरातील मौजे परडवाडी येथे शरद चंद्रकला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय नायगाव बाजार यांच्या वतीने राष्ट्रीय सेवा योजना विशेष शिबिर घेण्यात आले . सदर शिबिर 16 जानेवारीपासून कार्यक्रमाचे सुरुवात झाली . सदर कार्यक्रम 22 जानेवारीपर्यंत घेण्यात येणार आहे.

या शिबिरामध्ये शरदचंद्र महाविद्यालयाचे विद्यार्थ्यांनी श्रमदान ग्राम स्वच्छता जलसंधारण, पाझर खड्डे निर्मिती, जल पुरणार भरण, नदी स्वच्छता ,समशानभूमी, शुभोषीकरण वृक्षारोपण ,ग्रामीण उद्योजकता ,एडस जनजागृती, रक्त श्य तपासणी ,कुष्ठरोग तपासणी ,स्त्रीभुषण हत्या ,बेटी बचाव बेटी पढाव, बालविवाह निर्मूलन, पथनाट्य ,समाज, प्रबोधन, महिला सशक्तीकरण, तसेच उद्योग, वेषण मुक्ती ,साक्षरता महिला, आरोग्य ,अंधश्रद्धा निर्मूलन, पशु लसीकरण पशुवैद्यकीय तपासणी ग्रामविकास यांच्या विविध योजना विषयी मार्गदर्शन करण्यात आले .

या राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नायगाव येथील शरदचंद्र महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉक्टर के हरिबाबू प्राचार्य हे अध्यक्षस्थानी होते प्रमुख पाहुणे म्हणून यशपाल भिंगे प्रसिद्ध विचारवंत पीपल्स कॉलेज नांदेड ,कुंटूर येथील वैद्यकीय अधिकारी, संकेत परडे विद्यार्थी प्रतिनिधी, सोनाली साळुंखे ,प्राध्याप डॉक्टर के हरि बाबू प्राध्यापक ,डॉक्टर एस एम पाटील, सौ संगीता गोविंदराव पर्डे सरपंच , राजेश शेख मुख्याध्यापक जिल्हा परिषद परडवाडी. प्राध्यापक गोरा परडे परडवाडी , पोलीस पाटील तंटामुक्त अध्यक्ष व पत्रकार विद्यार्थी ग्रामविकास अधिकारी आगलावे  उपस्थित होते.

 

img 20250118 wa0028
img 20250118 wa0028

सदर कार्यक्रमाचे प्रस्तावना कदम यांनी केले सदर कार्यक्रमाचे नियोजन व आयोजन प्राध्यापक गोरा परडे सरपंच प्रतिनिधी यांच्या पुढाकारातून सर्व कार्यक्रम घेण्यात आला आहे.
येथे शरचंद्र कला वाणिज्य विद्यालयाचे सर्व विद्यार्थ्यांनी सहा दिवस तेथे राहून गावातील सर्व नागरिकांना जनजागृती पर कार्यक्रम घेऊन श्रमदान ते अंधश्रद्धा निर्मूलन या सर्व विषयावर योग्य मार्गदर्शन करण्यात आहेत .राष्ट्रीय सेवा योजना सल्लागार सर्व सहकारी प्राध्यापक शिक्षक तर कर्मचारी व समस्त गावकरी मंडळ यावेळीं कार्यक्रमात उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button