Latest Newsआपला जिल्हानांदेडनायगांव

नायगावला प्रवासी निवारा कधी मिळणार? रखरखत्या उन्हात प्रवाशांचे बेहाल.. बस प्रवासी निवाऱ्याच्या जागी झाले अतिक्रमण..

नायगावला प्रवासी निवारा कधी मिळणार? रखरखत्या उन्हात प्रवाशांचे बेहाल.. बस प्रवासी निवाऱ्याच्या जागी झाले अतिक्रमण.. प्रवाशांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांकडे  आमदार आणि खासदारांचे दुर्लक्ष. अशा रखरखत्या उन्हात प्रवाशांना थांबण्यासाठी कमीत कमी टेन्ट ची सा .बा.च्या किंवा महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी व्यवस्था करावी अशी प्रवाशांची मागणी..

रघुनाथ सोनकांबळे नायगाव…

नायगाव शहरात नांदेड हैदराबाद या महामार्गावरील असलेला एस टी  महामंडळाचा प्रवासी निवारा अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला त्या प्रकरणाची कोणत्याही संबंधित महामंडळाच्या किंवा सा .बा .च्या अधिकाऱ्यांनी दखल घेतली नाही. त्यामुळे आज प्रवाशांना नायगावच्या नांदेड हैदराबाद या महामार्गावरील रोडवर  रखरखत्या उन्हात उभा टाकून एस टी बस ची वाट पाहावी  लागत आहे.

20250319 141201
20250319 141201

मार्च संपत आला एप्रिल मे या दोन महिन्यात पूर्ण कडाक्याचे ऊन असणार आहे .त्यामुळे या नायगाव शहरात प्रवाशांसाठी बस स्थानक नसले तरी चालेल केवळ त्यांना थांबण्यासाठी सावलीचा निवारा असणे अत्यंत गरजेचे आहे. कारण प्रवासासाठी महिला ,छोटे बाळ ,वयोवृद्ध, अशांची संख्या जास्त असल्याने त्यांना या उन्हापासून संरक्षणाची अत्यंत गरज आहे .असे असले तरी आज या ठिकाणी किमान प्रवाशांना सावलीसाठी एखादा कॉटनचा टेंट असने अत्यंत गरजेचे आहे.अशा परिस्थितीत या तालुक्याचे आमदार आणि जिल्ह्याचे खासदार यांनी या प्रवाशांच्या गंभीर प्रश्नाकडे लक्ष देऊन यांची तात्काळ सावलीत उभा टाकण्याची व्यवस्था करावी अशी प्रवाशांची मागणी होत आहे.

अशातच बस स्थानकाच्या दोन्ही बाजूने दोन किलोमीटरच्या आसपास अतिक्रमणाने आपले पाळीमुळे मजबूत केले असून आता अतिक्रमण निघणे शक्य नाही. असे प्रवाशांना वाटत आहे. बस स्थानकाच्या जागी अचानक केव्हाही अपघात होऊ शकतो अशी परिस्थिती या अतिक्रमणातून निर्माण झाली आहे. बस स्थानकाच्या आसपास गाडी उभा करण्यासाठी जागा तर नाहीच परंतु प्रवाशांना सुद्धा थांबण्यासाठी जागा उरलेली नाही. ज्या लोकांनी अतिक्रमण केले तिथे आपले मोठे मोठे दुकान थाटून बसलेत त्यांच्यासमोर त्यांच्याच दुकानचे सामान असल्यामुळे सदर दुकानदार प्रवाशांना तेथे थांबु देत नाहीत. अशा परिस्थितीत तेही उन्हात प्रवासी थांबावे कुठे हा प्रश्न निर्माण होत आहे. अशा प्रवाशांच्या गंभीर प्रश्नांकडे शहरातील पुढाऱ्यांनी वेळीच लक्ष देऊन झालेले व होत असलेले अतिक्रमण तात्काळ हटविले तर पुढे होणारा अनर्थ टाळता येतो अशी चर्चा प्रवाशात होताना दिसत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button