नागठाणा ता. उमरी या गावातील बारावीत शिक्षण घेत असलेल्या मुलीवर अत्याचार करून तिचा निर्गुण पणे खून करण्यात आला.

. या घटनेला तब्बल चार दिवस ओलांडून गेले आहे तरी पोलीस प्रशासन अजुन तरी गुन्हा दाखल केला नाही. याप्रकरणी तात्काळ गुन्हा दाखल झाला नाही तर ऑल इंडिया पॅंथर सेनेच्या वतीने आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
उमरी विशेष प्रतिनिधी ..दि..(२३)) पीडित कुटुंब घिसडी समाजातील असून रोज मजुरी करून खाणारे आपल्या मुलीस चांगले शिक्षण द्यावे म्हणून मजुरी करून आपले जीवन जगत आहेत.त्या मुलीने पोलीस बनण्याचे स्वप्न पाहिले होते असे त्या मुलीचे आई वडील व भाऊ सांगत आहेत. आणि एक दिवस असा येतो की मुलगी रात्री उठून शौचालयास जाते आणि परत घरी अजून कशी आली नाही म्हणून शोध घेतात .
तेव्हा ती मुलगी संशयत पदी आढळून येते मुलीचे आई वडील व भाऊ यांनी पाहतात की मुलीच्या गळ्याला दोरीने आवळल्यासारखे निशान दिसत आहे.हे प्रकरण गावामध्ये समजताच गावातील पोलीस पाटील व इतर सहकार्याने त्या मुलीची अंत्यविधी आम्हा नातेवाईकास कोणासही न विचारता अग्नी देऊन करण्यात आली असल्याची तक्रार केली आहे असे मुलीचे आई वडील व भाऊ सांगत आहे.
मुलीचे आई वडील व भाऊ सांगत आहेत की आम्हाला कोणतीही कल्पना न देता आमच्या मुलीला अग्नी देऊन पुरावे नष्ट करण्याचे प्रयत्न केले आहे. आणि घिसडी समाजामध्ये अविवाहित मुलीला अग्नि न देता दफन करण्याची प्रथा आहे. याप्रकरणी पोलिसात तक्रार देऊनही पोलीस अजून गुन्हा दाखल केला नाही. सदर प्रकरणाला चार दिवस उलटून गेले आहेत तरी गुन्ह्याची नोंद होत नाही हे आश्चर्य.
सदर प्रकरणी एका भटक्या समाजातील अत्यंत क्रूरपणे मुलीवर अत्याचार करून तिचा खून करण्यात आला तरी पण उमरी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल होत नाही याप्रकरणी तात्काळ आरोपीवरुद्ध गुन्हा दाखल करून आरोपींना अटक करण्यात यावी अन्यथा ऑल इंडिया पॅंथर सेना च्या वतीने तीव्र जना आंदोलन करण्यात येईल असा इशारा ऑल इंडिया अंतर सेनेचे नांदेड जिल्हा अध्यक्ष माधव भालेराव यांनी दिला आहे



