मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून सन 2021 व 2022मध्ये परडवाडी ते कुंटूर रस्त्याचे काम करण्यात आले.हा रस्ता तयार करत असताना त्यावरील पुलाची उंची अतिशय कमी झाल्यामुळे सर्व साधारण पाऊस जरी पडला तरी हा रस्ता येण्या जाण्यासाठी पूर्णतः बंद होतो. परवा झालेल्या पावसामुळे परडवाडी ते कुंटूर या पुलावरून पाणी जात असल्याने मारुती धोंडीबा वजीरगे या रुग्णाला तराफ्यातून उपचारासाठी हॉस्पिटल ला नेण्यात आले.
या पुलाची उंची वाढवावी या साठी वांरवार नायगाव चे आमदार व तहसीलदार, यांना निवेदन येऊनही या कडे मात्र त्यांनी दुर्लक्ष केले असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले आहे. हा रस्ता केवळ परडवाडी च नाही तर सांगवी,मेळगाव आणि धनंज या गावकऱ्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. कारण कुंटूर ते सांगवी रस्ता हा बॅक वॉटर मुळे वारंवार पाण्याखाली जातो. व सांगवी , मेळगाव, धनंज या गावकऱ्यांची परडवाडी च्या रस्त्याने वाहतूक होते. कुंटूर ते सांगवी हा रस्ता मजबूत पद्धतीने बांधला गेला आहे .
तसाच रस्ता परडवाडी, सांगवी,मेळगाव,धनंज असा गेला असता तर या चारही गावच्या लोकांचा होणारा त्रास वाचला असता .गेल्या वर्षी ही असेच गंगाधर विठोबा खनपट्टे व आनंदा मोहन वाघमारे हे याच पुलावरून वाहून जात असताना गावकऱ्यांच्या सत्कारतेमुळे वाचले असे ही गावकऱ्यांनी सांगितले. या छोट्या पुलामुळे आम्हाला धोका असून शासनाने याच्यावर लवकरात लवकर पाऊल उचलून पुलाची उंची वाढवावी अशी परडवाडी येथील नागरिकांची मागणी आहे.