भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीचे औचित्य साधत गेल्या चार वर्षापासून नायगाव शहरातील डॉ. हेडगेवार चौकामध्ये सी.आर.पी.एफ. चे जवान पंढरी शिवलिंग भद्रे परिवाराच्या वतीने अन्नदान वाटप करण्यात येत असून यावेळीही नायगाव येथील डॉ. हेडगेवार चौकामध्ये अन्नदानाच्या कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.
या वेळी महामानवांच्या प्रतिमेचे पूजन नायगाव न.प. उपनगराध्यक्ष विजय चव्हाण.पोलीस उप अधिक्षक किरण पोपळधट , नांदेड जिल्हा परिषदेचे माजी सभापती तथा काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संजय अप्पा बेळगे.जिल्हा पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष सुर्यकांत सोनखेडकर यांच्या हस्ते करण्यात आले..
या कार्यक्रमास पोलीस निरीक्षक मारकड, नगराध्यक्ष प्रतिनिधी संजय चव्हाण.पत्रकार प्रभाकर लखपत्रेवार,नगरसेवक पंकज चव्हाण, नगरसेवक विठ्ठल बेळगे,अंकुश गायकवाड, विजय भालेराव .नगरसेवक प्रतिनिधी रवींद्र भालेराव ,अशोक गायकवाड. चंद्रकांत आंबेवार. मंगेश हानवटे. बाबू झगडे. संजय भद्रे. रमेश भद्रे. राजू भद्रे. सिद्धार्थ गायकवाड. सचिन भद्रे. जयवंतराव वाघमारे .धम्मदीप भद्रे. मंगेश हनवटे सर. प्रमोद घंटेवाड. भीमराव हनमंते. सुनील पोटफोडे. भीमराव बेलके सर. साईनाथ नामवाडे. माधव माधव डोनगांवे.विजय सोंडारे सोनजे.संजय भद्रे.शेषराव रोडे .राहुल इंगळे. लक्ष्मण गायकवाड. प्रकाश कुराडे प्रकाश कागडे .यांची प्रमुख उपस्थिती होती.
या कार्यक्रमाचे आयोजन गेल्या चार वर्षापासून भद्रे परिवाराच्या वतीने या ठिकाणी करण्यात येत आहे. आयोजक पंढरी शिवलिंग भद्रे ,कांताताई पंढरी भद्रे. विशाल भद्रे, ऋतिक भद्रे, यांनी केले असून शहरातील हजारो आंबेडकर प्रेमींनी अन्नदानाचा लाभ घेतला. या कार्यक्रमाचे संचलन पत्रकार प्रकाश हनमंते यांनी केले.