Latest Newsआपला जिल्हानांदेडमुदखेड

मुदखेडला होणार १०० खाटांचे ग्रामीण आरोग्य प्रशिक्षण केंद्र*

आ. श्रीजया चव्हाण यांचा पुढाकार; भूखंडासाठी मिळाली मान्यता*

रघुनाथ सोनकांबळे…..

 

नांदेड येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय अंतर्गत मुदखेड येथे ग्रामीण आरोग्य प्रशिक्षण केंद्र उभारण्याची कार्यवाही सुरु झाली असून, आ. श्रीजया चव्हाण यांच्या पुढाकारातून आकार घेत असलेल्या या प्रकल्पामुळे मुदखेड व परिसरातील नागरिकांसाठी १०० खाटांचे आरोग्य सुविधा केंद्र उपलब्ध होणार आहे.ग्रामीण आरोग्य प्रशिक्षण केंद्र हे वैद्यकीय शिक्षण महाविद्यालय व रुग्णालयाशी संलग्न असे प्रशिक्षण व आरोग्यसेवा केंद्र असते. ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्य सेवा पुरविण्यासोबतच वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना व इंटर्न डॉक्टरांना ग्रामीण क्षेत्रात आरोग्यविषयक प्रत्यक्ष अनुभव मिळावा, हा या केंद्राच्या स्थापनेचा उद्देश असतो.
Screenshot 20251005 191615 Youtube
Screenshot 20251005 191615 Youtube
नांदेडच्या डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या अंतर्गत हे केंद्र मुदखेड येथे उभारावे, यासाठी माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली भोकर विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्रीजया चव्हाण यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांच्या पाठपुराव्यामुळे मुदखेडच्या ग्रामीण आरोग्य प्रशिक्षण केंद्रासाठी मुदखेड नगर परिषदेच्या हद्दीतील गट क्र. ४६० मधील जलसंपदा विभागाची बिनवापर पडून असलेली २ हेक्टर जमीन कायमस्वरुपी हस्तांतरीत करण्यास संमतीपत्र मिळाले आहे. या भूखंडाच्या मोबदल्यात वैद्यकीय शिक्षण विभागाकडून ८.५४ कोटी रुपये अदा करण्यास संमती प्रदान करण्यात आली आहे.
Screenshot 20251005 191540 Youtube
Screenshot 20251005 191540 Youtube
मुदखेड येथे नियोजित ग्रामीण आरोग्य प्रशिक्षण केंद्रात रुग्णांच्या उपचारासाठी १०० खाटांची व्यवस्था असेल. याशिवाय सोनोग्राफी, पॅथॉलॉजी लॅब, मायक्रोबायोलॉजी लॅब, बायोकेमेस्ट्री लॅब, एक्सरे मशीन, होस्टेल, निवासी डॉक्टरांसाठी निवासस्थाने आदी सुविधा देखील उभारल्या जातील. या केंद्रासाठी भूखंडाची उपलब्धता झाल्यामुळे आता पुढील कार्यवाहीला वेग मिळणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button