Latest Newsआपला जिल्हानांदेडनायगांव

गायरानाची उघड लूट! कांडाळा–होटाळा शिवारात ‘महसूल–क्रेशर संगनमत’, हजारो ब्रास दगड चोरीला; सरकारचा लाखोंचा महसूल बुडवला.

 

रघुनाथ सोनकांबळे
नायगाव..

नायगाव तहसील कार्यक्षेत्रातील कांडाळा व होटाळा शिवारातील शासकीय गायरान जमिनीत सध्या क्रेशरवाल्यांचा उच्छाद माजला असून महसूल विभागाच्या संगनमतानेच दगडाची उघडपणे चोरी सुरू असल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांकडून होत आहे. तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने दररोज हजारो ब्रास दगड व धोंडे अवैधरित्या उपसले जात असून शासनाच्या तिजोरीवर दिवसाढवळ्या डल्ला मारला जात आहे.
Screenshot 20260107 113847 Youtube
Screenshot 20260107 113847 Youtube
या परिसरात परवानगी व बगर परवानगी खडी केंद्र मोठ्या प्रमाणात आहेत व परवानगी क्रेशरसाठी स्वतंत्र व अधिकृत सर्वे नंबर उपलब्ध असतानाही जाणीवपूर्वक क्रेशरवाले गायरान जमीन लक्ष्य करून मोठ्या प्रमाणात दगडाचे उत्खनन केले जात आहे. या परिसरात अवजड यंत्रे, जेसीबी, पोकलेन, ट्रॅक्टर व डंपरांच्या रांगा दिवसरात्र दगडाचे उत्खनन  सुरू असून गायरान जमीन अक्षरशः खणून-खणून दगड  विक्रीस काढला जात आहे;  महसूल विभाग मात्र आंधळा-बहिरा बनून तमाशा पाहत बसला आहे.
Screenshot 20260107 113818 Youtube
Screenshot 20260107 113818 Youtube
“आमचे कोणीही काही वाकडे करू शकत नाही, अधिकारी आमच्याच खिशात आहेत” अशा मग्रुरीत क्रेशर चालक खुलेआम भाषा वापरत असून, हे शब्दच महसूल यंत्रणेच्या निष्क्रियतेवर शिक्कामोर्तब करणारे आहेत. परिणामी दररोज लाखो रुपयांचा शासकीय महसूल बुडत असून त्याची भरपाई नेमकी कोण करणार, असा सवाल उपस्थित होत आहे.
Screenshot 20260107 121410 Youtube
Screenshot 20260107 121410 Youtube
गायरान जमीन ही जनतेची व पशुधनाची असताना ती कंत्राटदार व दलालांच्या घशात घालण्याचा अधिकार कोणत्या कायद्याने दिला, व कोणी दिला हा प्रश्न आता भेडसावत आहे. पर्यावरणाचा ऱ्हास, डोंगरांची चिरफाड, पाण्याच्या स्रोतांचे नुकसान होत असताना संबंधित अधिकारी मात्र ‘हप्ते–संरक्षण’ योजनेत रमले आहेत का? अशी संतप्त चर्चा नागरिकांत जोरात रंगली आहे.
या प्रकरणी तात्काळ जिल्हास्तरावरून उच्चस्तरीय चौकशी, संबंधित उत्खननस्थळांचे ड्रोन सर्वेक्षण, दोषी तलाठी–मंडळ अधिकारी यांचे निलंबन, तसेच अवैध उत्खनन करणाऱ्या क्रेशर चालकांवर गुन्हे दाखल करून यंत्रसामग्री जप्त करण्याची मागणी होत आहे.
अन्यथा गायरानाची ही लूट थांबवण्यासाठी जनतेला रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button