Latest Newsआपला जिल्हानांदेडनायगांव

डांबरी रस्त्यावरून पूरस्थितीचा आढावा – पालकमंत्र्यांच्या दौऱ्यावर नागरिकांचा रोष

 

पूर परिस्थितीचा आढावा का फोटोशूट कार्यक्रम युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष माणिक चव्हाण यांचा सवाल

रघुनाथ सोनकांबळे….

 

नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार अतुलजी सावे साहेबांनी नायगाव तालुक्यातील पूरग्रस्त भागाच्या पाहणीसाठी आले असता त्यांचा दौरा केवळ औपचारिक ठरल्याची चर्चा जिल्हाभर रंगली आहे. खरी परिस्थिती जाणून घेण्याऐवजी केवळ रोडवरूनच पाहणी करून परतल्याने पूरग्रस्त व शेतकरीवर्गामध्ये प्रचंड नाराजी व्यक्त होत आहे.
सलग दोन दिवस नायगाव शहर पाण्याखाली होते, घरे उद्ध्वस्त झाली, शेतकरी हतबल झाले, तरीही पालकमंत्र्यांची पाहणी केवळ दोन मिनिटांतच संपली. कुंचेली व बरबड्यासारखी गावं चोहोबाजूंनी पाण्याने वेढली असताना, मंत्री केवळ डांबरी रस्त्यावरूनच आढावा घेतल्याचे नागरिकांनी स्पष्टपणे निदर्शनास आणले.

पालकमंत्री महोदय हे डांबररोडने आले, डांबररोडवरून पूर परिस्थितीचा आढावा घेतला, डांबर रोडवरून गेले ,  हा सर्व खटाटोप फोटो सूट करण्याचा होता की काय? असा संतप्त सवाल नागरिकांतून होत आहे.

 

या पाहणी दौऱ्यात शासकीय गाड्यांचा लावाजमा घेऊन मोठ्या प्रमाणावर खर्च करण्यात आल्याची जोरदार टीका होत आहे. पूरग्रस्तांच्या डोळ्यांतील अश्रू पुसण्याऐवजी गाड्यांची उधळपट्टी करून केवळ फोटोशूटपुरता दौरा झाला, अशी जनतेत भावना आहे.
शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकण्याऐवजी मंत्र्यांच्या सभोवती फक्त भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा गराडा दिसला. त्यामुळे नागरिकांच्या अपेक्षा भंगल्या असून, “पूरग्रस्त भागाची पाहणी की दिखाऊ कार्यक्रम?” असा थेट सवाल नायगाव युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष माणिक पाटील चव्हाण यांनी उपस्थित केला

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button