Latest Newsआपला जिल्हानांदेडनायगांव
नायगाव नगरपंचायतीकडून हेडगेवार चौक ते राजुरा मंदिर दुतर्फा रस्त्यावरील अतिक्रमण धारकांना ३ दिवसांत अतिक्रमण हटविण्याचे आदेश..

रघुनाथ सोनकांबळे
नायगाव..
नायगाव नगरपंचायतीकडून महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम 1966 च्या कलम 52 नुसार अतिक्रमण धारकांना नोटीस देण्यात आली असून, संबंधितांनी तात्काळ अतिक्रमण हटविण्याचे निर्देश दिले आहेत. हेडगेवार चौक ते राजूरा मंदिर, दुतरपा रस्त्याचे काम, सी सी नालीचे काम चालू असुन रस्त्यावरील अनधिकृत बांधकाम व व्यापारी कामकाजामुळे येथील वाहतूक व नागरिकांना होत असलेल्या अडचणींचा विचार करून ही कारवाई करण्यात येत आहे.
काही दिवसापूर्वी महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ( एम. एस. आय. डी. सी) अधिकाऱ्यांकडून हेडगेवार चौक ते राजुरा मंदिरापर्यंत असलेल्या दुतर्फा रोडवरील अतिक्रमण धारकांना नोटीस देऊन सात दिवसाच्या आत अतिक्रमण काढून घेण्याचे कळवले होते तरीपण अतिक्रमणधारकांनी त्या नोटिसींना केराची टोपली दाखवल्याने नगरपंचायत नायगाव यांना ही कारवाई करावी लागली असावी अशी जोरदार चर्चा नायगाव शहरात होत आहे.
नगरपंचायतीनुसार, महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास मंडळाच्या (MSIDC) अधिकार्यांनी सदर जागेची पाहणी करून ती जागा शासकीय नियोजनात येत असल्याचे स्पष्ट केले आहे. यानुसार अनधिकृत बांधकामावर मार्किंग (चिन्हांकन) करून ३ दिवसांत अतिक्रमण स्वतःहून हटविण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

नगरपंचायतीने इशारा दिला आहे की, निर्धारित मुदतीत अतिक्रमण हटविण्यात अपयश आल्यास ते पाडून टाकण्यात येईल (Destroy) आणि त्याचा सर्व खर्च संबंधित अतिक्रमण धारकांकडून वसूल करण्यात येईल. ही कारवाई महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन अधिनियम 1966 व महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायत व औद्योगिक नगरी अधिनियम 1965 अंतर्गत करण्यात येणार आहे.




