Latest Newsआपला जिल्हानांदेड
स्मृ.अंजनामाई कागडे कृष्णुरकर यांच्या चौथ्या स्मृती दिनी आज नांदेडमध्ये मोफत आरोग्य व नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन.

नादेड प्रतिनिधी…..
स्मृतिशेष अंजनामाई कागडे कृष्णुरकर यांच्या चौथ्या स्मृती दिनाचे औचित्य साधून यदाही आज दिनांक १४ जुन रोज रविवारी कागडे परिवाराच्यावतिने मोफत आरोग्य व नेत्र तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले असून जनतेने याचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
नांदेड जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या डाॅ.मिनाक्षी शिवाजीराव कागडे कृष्णूरकर व परिवाराकडून सातत्याने विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात.त्यांच्या सासू स्मृतिशेष अंजनामाई कागडे कृष्णूरकर यांच्या चौथ्या स्मृतिदिनी यंदाही रविवारी दि.१४ जून रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत नांदेड शहरातील दस्तापुरे कॉम्प्लेक्समध्ये गणेश नगर रोड,पचशिल हायस्कूल समोर नादेड येथे मोफत आरोग्य व नेत्र शिबिराचे आयोजन केले आहे.
या शिबिरात शुगर तपासणी,बी.पी. तपासणी, हृदयाचे ठोके (कार्डियाक मॉनिटर द्वारा ) नेत्र तपासणी, रक्तगट तपासणी आरोग्य विषयक सल्ला,डायबिटीस व हार्ट अटॅक यांची तपासणी करण्यात येणार आहे.
डॉ.शिवाजी कागडे कुष्णूरकर (एमडी मेडिसिन ) यांच्याकडून बी.पी,डायबेटीज,पोट विकार, छाती रोग,त्वचा रोग व तज्ञ,डॉ. मिनाक्षीताई कागडे (बनसोडे ) यांच्याकडून बालरोग,स्त्रीरोग व प्रसूती चिकित्सा तर, डॉ.प्रथमेश मसुरे (एम.डी (होमिओपॅथी)) सी.सी.एम होमिओपॅथिक तज्ञ व पॅथॉलॉजिस्ट भोरगे या तज्ज्ञांकडून रुग्णांची तपासणी करण्यात येणार आहे .



