Latest Newsआपला जिल्हाधर्माबाद
बुद्धगया महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन महामोर्चात लाखोंच्या संख्येत बौद्ध अनुयायी सामील झाले.

नांदेड दि.( २५)…
आज नांदेड येथे बुद्धगया महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन महामोर्चा सामील होण्यासाठी वंदनीय भिकू संघाकडून व विविध आंबेडकर पक्ष संघटना व सामाजिक संघटनेच्या वतीने पुकारण्यात आलेल्या मोर्चात लाखोच्या संख्येने बौद्ध अनुयायी सामील झाले.



. सदर महामोर्चा हा कृषी उत्पन्न बाजार समिती नांदेडच्या मैदानातून दुपारी बारा वाजता सुरुवात झाला .



तो महात्मा ज्योतिबा फुले पुतळा, शिवाजीनगर मार्गे जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय, वजीराबाद चौक, ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून ते जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे धडकला.



जिल्हाधिकारी कार्यालयात वंदनीय भिकू संघ यांनी बुद्धगया येथील महाबोधी महाविहार मुक्त करून तो बौद्धांच्या भिकू संघाकडे देण्यात यावा अशा आशयाचे निवेदन जिल्हाधिकारी मार्फत देशाचे पंतप्रधान व महामहीम राष्ट्रपती यांना देण्यात आले.



नंतर सदर मोर्चाचे रूपांतर वंदनीय भिकू संघा च्या मार्गदर्शन सभेत झाले.आणि मार्गदर्शनानंतर मोर्चाचा समारोप करण्यात आला .



या महामोर्चात नांदेड जिल्ह्यातील आंबेडकर चळवळीतील सर्व दिग्गज नेते सुरुवातीपासून ते मोर्चाच्या समारोपापर्यंत उपस्थित होते.





