Latest Newsआपला जिल्हानांदेडनायगांव

 नांदेड हैदराबाद महामार्गावरील नायगाव तहसील जवळ अज्ञात चोरट्याने तोंडावर स्प्रे मारून शेतकऱ्याकडील 25 हजार रुपये व पाच ग्रॅम सोन्याची अंगठी लंपास केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. 

रघुनाथ सोनकांबळे

नायगाव….

 

   नायगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत नांदेड हैदराबाद या महामार्गावरील मुख्य तहसील रोडवर अज्ञात चोरट्यांनी देगाव येथील माधव गंगाराम मोरे यांच्या तोंडावर स्प्रे मारून रोख रक्कम पंचवीस हजार व पाच ग्राम सोन्याची अंगठी घेऊन बोंबारा केला आहे.
 आज दिनांक 16 नायगाव तहसीलच्या मुख्य रस्त्यावरील देगाव येथील माधव गंगाराम मोरे हे शेतकरी आपल्या शेताकडे सोयाबीन काढत असलेल्या मशीनला पंचवीस हजार रुपये देण्यासाठी जात असताना हैदराबाद या महामार्गावर तहसील रोड नजीक अज्ञात चोरट्यांनी मोटरसायकलवर येऊन मोरे यांच्या तोंडाला स्प्रे मारला व बाजूला नेऊन तुझ्या शेतात गांजा पेरलास काय अशी चौकशी केली त्यावरून मोरे यांनी माझ्या शेतात काहीच नाही असे म्हणत असताना अचानक त्याच्या खिशातील पंचवीस हजार रुपये व हातातील पाच ग्रॅम सोन्याची अंगठी घेऊन त्या दोन अज्ञात चोरट्याने बोंबारा केला आहे.
भर दिवसा घडलेल्या दरोड्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे अशा गंभीर घटना घडली नायगाव पोलिसांनी लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button