Latest Newsआपला जिल्हानांदेडनायगांव

जनसेवेचा आदर्श जपत! नायगावच्या जयराज पॅलेसमध्ये सुसज्ज ओपन जिमचे लोकार्पण

यदुबन महाराज यांच्या हस्ते उद्घाटन; मनोज पाटील मोरे यांचा स्तुत्य उपक्रम

रघुनाथ सोनकांबळे……..

नायगाव शहरातील जयराज पॅलेसचे मालक तथा मोरे कन्स्ट्रक्शन कंपनीचे संचालक मनोज रावसाहेब पाटील मोरे टाकळीकर यांनी सामाजिक बांधिलकी जपत जनसेवेचा नवा आदर्श निर्माण केला आहे. नांदेड–हैदराबाद राज्य महामार्गावरील जयराज पॅलेस परिसरात त्यांनी स्वखर्चातून तब्बल पाच लाख रुपये खर्च करून सुसज्ज ओपन जिम उभारली आहे.
ही ओपन जिम त्यांच्या वडिलांच्या, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष कै. रावसाहेब विठ्ठलराव पाटील मोरे टाकळीकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ उभारण्यात आली असून,त्यांच्या चौथ्या स्मृतिदिनानिमित्त कोलंबी मठाचे गुरुवर्य यदुबन महाराज यांच्या शुभहस्ते तिचे उद्घाटन करण्यात आले.
नागरिकांच्या आरोग्यदायी जीवनशैलीसाठी उभारण्यात आलेली ही सुविधा परिसरातील युवक, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरत आहे. पहाटेपासूनच व्यायामासाठी नागरिकांची येथे गर्दी होत असून, आधुनिक उपकरणांनी सज्ज असलेल्या या ओपन जिममुळे नायगाव शहरात आरोग्याबाबत सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे.
उद्घाटन प्रसंगी राजेश देशमुख कुंटुरकर, दिलीपराव धर्माधिकारी, बालाजी मदेवाड, शिवाजीराव धर्माधिकारी यांच्यासह पंचक्रोशीतील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मनोज पाटील मोरे यांच्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button