Latest Newsआपला जिल्हानांदेडनायगांव

कुस्नूर एमआयडीसी परिसरात बिबट्याचा वावर नागरिकात भीतीचे वातावरण.. एका तरुणावर बिबट्याचा पाठीमागून हल्ला…..

रघुनाथ सोनकांबळे

नायगाव…

कृष्णूर MIDC परिसरात आज दुपारी घडलेल्या धक्कादायक घटनेने संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दोन तासांपूर्वी एका तरुणावर बिबट्याने पाठीमागून झडप घालत हल्ला केला. सुदैवाने संबंधित युवक थोडक्यात बचावला असून त्याला किरकोळ दुखापत झाली आहे.

या घटनेची माहिती मिळताच कुंटूर पोलीस स्टेशन आणि संबंधित वनविभागाने तातडीने सर्च ऑपरेशन सुरू केले. आसपासच्या गावांमधील सर्व पोलीस पाटीलांना नागरिकांना सतर्क करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कृष्णूर MIDC, नायगाव कृष्ण परिसर, तसेच आजूबाजूच्या खेड्यांत भीतीचे सावट पसरले असून ज्या तरुणावर बिबट्याने एमआयडीसी परिसरात सिटी कंपनीच्या समोर पाठीमागून हल्ला केला त्यांनी तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला आहे .त्या आधारावर घटनेची माहिती आम्ही डांगोरी 24 तास या न्यूज पोर्टलवरून देत आहोत.

दरम्यान, MIDC परिसरातील विविध कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कामगारांमध्ये मोठी घबराट निर्माण झाली आहे. हल्ल्यात जखमी झालेल्या युवकावर उपचार सुरू आहेत. प्राथमिक माहितीनुसार, बिबट्या MIDC शेजारील माळरानाच्या भागात आश्रय घेण्यासाठी गेला असल्याचे समजते.

 कुस्नूर एमआयडीसी व परिसरातील नागरिकांनी आपापली काळजी घ्यावी.अनावश्यकपणे घराबाहेर पडू नये रात्रीच्या वेळी एकटे फिरू नये .बिबट्या दिसल्यास तातडीने पोलिसांना किंवा वनविभागाला माहिती द्यावी. कृष्णूर MIDC परिसरात अद्यापही शोधमोहीम सुरू असून परिस्थितीवर प्रशासनाचे बारकाईने निरीक्षण आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button