नायगाव तालुक्यातील कुंटूर येथील खंडोबा मंदिर वर्धापनदिनानिमित्त मल्हारी म्हाळसाकांत कथा सोहळा सुरू करण्यात आला असून ५ मे रोजी रोजी सांगता होणार आहे. खंडोबा मंदिर वर्धापनदिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे दररोज रात्री आयोजन करण्यात आले आहे.
कुंटूर येथील खंडोबा मंदिराचा जिर्णोद्धार करण्यात आला होता. त्या निमित्ताने वर्धापन दिनाच्या निमित्ताने अनेक कार्यक्रमांचे आयोजन गावकरी मंडळींनी केले आहे. खंडोबा मंदिरात दररोज रात्री ८ ते १० वाजून ३० मिनिटापर्यंत श्री मल्हारी म्हाळसाकांत कथा सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
ह भ प भागवताचार्य ज्ञानेश्वर महाराज बरबडेकर यांच्या वाणीतून मल्हारी म्हाळसाकांत कथा श्रावण करण्याचा योग आला आहे. शेवाळे गुरुजी बरबडेकर, रामराव गुरुजी नांदेडकर, बालाजी पुयड यांच्या संगिता ची जोड लाभली आहे. कथेच्या निमित्ताने दररोज रात्री विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
मल्हारी म्हाळसाकांत कथा सोहळा ५ मे रोजी संपणार आहे. ५ मे रोजी सकाळी ११ वाजता खंडेरायाची पालखी मिरवणूक संपुर्ण गावातून निघणार आहे. सायंकाळी ६ वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी कुंटूर येथील ग्रामस्थांनी यांचा लाभ घ्यावा असे आवाहन गावकरी मंडळी यांच्या वतीने करण्यात आले आहे.