Latest Newsआपला जिल्हानांदेडनायगांव
कुंटुर येथे ७ मार्च रोजी ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर’

रघुनाथ सोनकांबळे
नायगाव…
महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाच्या वतीने नागरिकांच्या विविध महसुली अडचणींचे तात्काळ निराकरण करण्यासाठी ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर’ आयोजित करण्यात आले आहे. हे शिबीर दि. ७ मार्च २०२६ रोजी सकाळी ११ वाजता जि. प. हायस्कूल, कुंटुर ता. नायगाव येथे होणार असल्याची माहिती महसूल प्रशासनाने दिली आहे.
या शिबिरामध्ये नागरिकांना महसूल विभागाशी संबंधित विविध सेवांचा लाभ एकाच ठिकाणी मिळणार आहे. त्यामध्ये प्रलंबित फेरफार, ७/१२ मधील चुका दुरुस्ती, डिजिटल स्वाक्षरीचे ७/१२ व ८-अ उतारे, उत्पन्न, रहिवासी व जातीचे दाखले, नॉन-क्रीमीलेअर प्रमाणपत्र आदी सेवा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
तसेच अकृषिक NA परवानगी, अकृषिक तडजोडीबाबत मार्गदर्शन, नवीन व्यवस्थापनानुसार सनद प्रक्रियेची माहिती, सामाजिक व आर्थिक योजनेचे लाभ मंजूर करणे, विद्यार्थ्यांसाठी विविध दाखले देणे यासह तुकडेबंदी कायद्याच्या उल्लंघनाच्या प्रकरणांचा निपटारा करण्यात येणार आहे. घरकुलासाठी पट्टे वाटप, ई-मोजणी अर्ज, अग्रीस्टॅक व पीएम किसान नोंदणी आदी बाबींवरही मार्गदर्शन करण्यात येणार आहे.




