आज दिनांक २३-१०-२०२५ रोजी वंचित बहुजन आघाडी नायगाव तालुक्याच्यावतीने होवू घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सार्वत्रिक निवडणुकी संदर्भात आढावा बैठकीचे आयोजन नरसी येथील शासकीय विश्रामगृहात करण्यात आले होते, या बैठकीत नायगाव तालुक्यातील चार जिल्हापरिषदा आणि आठ पंचायत समिती गण असून यामध्ये पक्षाचा उमेदवार कोण द्यायचा, पक्षातील इच्छुक कार्यकर्त्यांचा विचार केला जावा, पक्षातील प्रामाणिक आणि जनतळ मजबूत असलेल्या कार्यकर्त्यांना पक्षाची उमेदवारी द्यावी हा सूर बैठकीत निघाला.
वंचित बहुजन आघाडी तालुक्यातील सर्व जिल्हापरिषदा आणि पंचायत समित्या ताकदीने लढवणार असल्याचे संकेत देण्यात आले. ही बैठक नायगाव तालुक्याचे तालुका अध्यक्ष साहेबराव कोपरेकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली बैठकीला तालुका उपाध्यक्ष सतीश वाघमारे, प्रभाकर घंटेवाड, धम्मानंद सोनकांबळे, शिवाजी पवार, राजीव राचोडकर, विलास वाघमारे, राहुल गायकवाड, सिदोधन लांडगे, दीपक जमदाडे, प्रताप बंडे, बालाजी गायकवाड, उध्दव डोईवाड इत्यादी कार्यकर्ते या बैठकीस उपस्थीत होते