आज दिनांक 10-05-2025 रोजी ऍड बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामीण रुग्णालय नायगाव येथे भारतीय बौद्ध महासभा आणि वंचित बहुजन आघाडीच्या वतीने फळ वाटप करण्यात आले.
देशात युद्ध जन्य परिस्थिती निर्माण झाल्याने बाळासाहेबनी आपल्या कार्यकर्त्यांना आपला वाढदिवस केक, फटाके इत्यादी पद्धतीने न करता तिरंगा रॅली आणि रक्तदान असा समाज उपयोगी पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन केले आहे. त्यानुसार ग्रामीण रुग्णालयात गरजू रग्णांना फळं वाटप करण्यात आली.
यावेळी भारतीय बौद्ध महासभा शाखा नायगावचे तालुका अध्यक्ष अनिल गायकांबळे संरक्षण उपाध्यक्ष गौतम जोंधळे, संरक्षण सचिव संजय गायकवाड, संरक्षण उपाध्यक्ष शशिकांत सोनसाळे, समता सैनिक रवी हणमंते, गंगासागर गौतम भेदेकर, भीमाबाई वाघमारे तसेच वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष साहेबराव कोपरेकर, उपाध्यक्ष सतीश वाघमारे, ता. सचिव विलास वाघमारे, उपाध्यक्ष प्रभाकर घंटेवाड, धम्मानंद जोंधळे, बळी भदरगे, राहुल गायकवाड, सिदोधन लांडगे, बाळासाहेब सोनकांबळे, धम्मानंद रातोळीकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.