*अभिज्ञा मनूरकर हिची ‘प्रजासत्ताक दिन’ पथसंचलन शिबिराकरिता निवड*
कु. अभिज्ञा अभयकुमार मनुरकर हिची २६ जानेवारी २०२५ रोजी प्रजासत्ताक दिनी दिल्ली येथे होणाऱ्या पथसंचलनासाठी निवड

धर्माबाद प्रतिनिधी दि.(१६)
धर्माबाद : येथील लाल बहादूर शास्त्री महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागातील स्वयंसेविका कु. अभिज्ञा अभयकुमार मनुरकर हिची २६ जानेवारी २०२५ रोजी प्रजासत्ताक दिनी दिल्ली येथे होणाऱ्या पथसंचलनासाठी निवड झाली आहे.
लाल बहादूर शास्त्री महाविद्यालयातील स्वयंसेवकांची आर. डी. परेड साठी सलग तिसऱ्या वर्षी निवड झालेली आहे. अशी विक्रमी कामगिरी करणारे शास्त्री महाविद्यालय हे महाराष्ट्रातील पहिलेच महाविद्यालय आहे.
यापूर्वी महाविद्यालयातील विष्णू विठ्ठल जाधव यांनी २६ जानेवारी २०२३ रोजी व कु.भाग्यश्री जनार्दन गैनवार हिने २६ जानेवारी २०२४ रोजी प्रजासत्ताक दिनी दिल्ली येथिल पथसंंचालनात महाविद्यालयाचे प्रतिनिधित्व केलेले आहे.
सदरील आर.डी. परेडसाठी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या परीक्षेत्रातील १७५०० स्वयंसेवकांमधून अभिज्ञा मनुरकर हिची निवड झालेली आहे. महाराष्ट्रातील चार लाखाहून अधिक स्वयंसेवकांंपैकी केवळ १४ स्वयंसेवकांची निवड करून महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्यासाठी दिल्ली येथे पाठविले जाते.
सदरील निवडीबद्दल धर्माबाद शिक्षण संस्थेचे सचिव डॉ. कमलकिशोर काकाणी, उपाध्यक्ष तथा सह-सचिव नागभूषण वर्णी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कमलाकर कणसे, उप-प्राचार्य डॉ. योगेश जोशी, कार्यक्रमाधिकारी डॉ. संभाजी मनूरकर, महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिज्ञा मनूरकर हिचा पालकांसह सत्कार व अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.



