Latest Newsआपला जिल्हानांदेडबिलोली

स्टेट बँकेत ग्राकांची कुचंबना ; बँक प्रशानाच्या हलगर्जीपणाने ग्राहक त्रस्त.

यशवंत मोरे

शंकरनगर : बिलोली तालुक्यातील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा. रामतीर्थ ही एकमेव कृषीविषयक शाखा आहे. बँक व्यवस्थापकाच्या ढिसाळ कारभाराने ग्राहक कमालीचे वैतागले आहेत. येथे परिसरातील शेतकरी,नोकरदार, निराधार, जेष्ठ नागरिक शेती विमाधारक ग्राहक पैसे उचलण्यासाठी बँकेत रांगा लावत असुन भौतिक सुविधा नसल्याने उकाड्यात रांगेत उभं असलेले ग्राहक बँकेत पैसे नाहीत म्हणून रिकाम्या हताने हताश होऊन वापस येत असून यास बँक व्यवस्थापन जबाबदार असल्याचे ग्राहकातून बोलल्या जात आहे.
ग्रामीण भागातील ग्राहक बँक ऊघडण्याच्या अगोदर बँकेसमोर रांगा लावत असुन दिवसभर रांगेत उभा टाकत आहेत. बँकेतील नोकरदार कुलरची थंड हवाखात थंड कामे करीत आहेत तर ग्राहकना मात्र प्रखर उकाड्याचा सामना करावा लागत असून पंखा किंवा कुलरची बँकेत ग्राहकासाठी कसलीच सुविधा नसल्याने ग्राहक कमालीचा वैतागला आहे.

येथील बँक कुठल्या ना कुठल्या कारणांसाठी चर्चेत असतेच लग्न सराईची लगबग चालू आहे. अशातच गेल्या एक अठवड्या पासून कॅश टंचाईच्या नावाखली ग्राहकास दिवसभर रांगेत उभे करून कॅश संपली म्हणून बँक प्रशासन घोषित करत आहे.त्यामुळे दिवसभर उकाड्यात उभे टाकलेले ग्राहक रिकाम्या हताने हताश होऊन घरी वापस येत आहेत.

स्टेट बॅंक ऑफ इंडिया शाखेच्या मनमाणी कारभारास ग्राहक कमालीचे वैतागले असून वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून ग्राहकांची होणारी कॅश टंचाई दुर करून ग्रहकाची होणारी कुचंबणा त्वरीत थांबवण्यात यावी अशी मागणी ग्राहकातून करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button